शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

विमानाचा रंग पांढरा का असतो? कधी विचारही केला नसेल 'या' कारणाचा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 19:10 IST

तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानांचं रंग पांढराच का असतो? कदाचित याकडे तुमचं लक्ष गेलं नसेल.

विमानात एकदा तरी प्रवास करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुमच्यापैकी अनेकांनी विमानात प्रवासही केला असेल. प्रवास केला नसेल तरी कमीत कमी विमान तरी पाहिलं असेल. तुम्ही पाहिलं असेल की,  सगळ्याच नाही पण जास्तीत जास्त विमानांचं रंग पांढराच असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, विमानांचं रंग पांढराच का असतो? कदाचित याकडे तुमचं लक्ष गेलं नसेल.

काय आहे कारण?

विमानाचा रंग पांढरा असण्यामागील सर्वात मोठं कारण वैज्ञानिक आहे. पांढऱ्या रंगाने विमानाला सूर्यकिरणांपासून वाचवलं जातं. पांढरा रंग हा उष्णतेपासून वाचवतो. रनवेपासून ते आकाशापर्यत विमान नेहमीच कडक उन्हातच राहतात. रनवे असो वा आकाश विमानांवर सूर्यकिरणे नेहमीच थेट पडतात. सूर्याची किरणं इंफ्रारेड असतात. ज्यामुळे विमानाच्या आत भयंकर उष्णता निर्माण होऊ शकते. अशात विमानाचा रंग पांढरा ठेवून विमान उष्णतेपासून वाचवलं जातं. पांढरा रंग सूर्याच्या किरणांना ९९ टक्के रिफ्लेक्ट करतो.

आणखी एक कारण

विमानाचा रंग पांढरा असल्याने कोणत्याही प्रकारचा क्रॅक किंवा भेग सहजपणे दिसून येते. जर विमानाचा रंग पांढऱ्या ऐवजी दुसरा असेल तर भेगा, क्रॅक लपले जातील. अशात पांढरा रंग विमानाच्या मेंटेनन्स आणि निरीक्षणासाठी फायदेशीर ठरतो.

पांढऱ्या रंगाचा असाही फायदा

विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचं आणखी एक मोठं कारण आहे. ते म्हणजे इतर सर्व रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगांचं वजन फार कमी असतं. पांढरा रंग लावल्याने विमानाचा भार जास्त वाढत नाही. जे आकाशात उडण्यासाठी फार गरजेचं आहे. तेच इतर कोणत्या रंगाचा वापर केल्याने विमानाचं वजन वाढू शकतं. अलिकडे काही विमानांचे रंग पांढरा नसून वेगळेही असतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेairplaneविमान