Cricket Interesting Facts : भारतामध्ये क्रिकेटकडे फक्त एक खेळ म्हणून नव्हे तर एक सणासारखा पाहिले जाते. इथल्या लोकांच्या रक्तातच इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटबद्दल सर्वाधिक उत्साह दिसून येतो. प्रत्येक गल्ली-मोहल्ल्यात तुम्हाला मुले क्रिकेट खेळताना दिसतील. शनिवार-रविवारी तुम्ही पार्कमध्ये गेलात तर मोठी माणसेही क्रिकेट खेळताना दिसतात. थोडक्यात सांगायचे झाले तर क्रिकेट लोकांच्या जीवनाचा भाग बनले आहे आणि लोक हा खेळ मोठ्या आनंदाने खेळतात व पाहतात. तुम्हीही त्याच लोकांपैकी एक असाल. क्रिकेटचे वेगवेगळे फॉर्म लोक आवडीने पाहतात. कुणी वन-डे बघतात, तर कुणाला टेस्ट मॅच आवडतात. हल्ली तर टी-२०चं फॅड आहे.
तुम्ही कदाचित साध्या कपड्यांमध्ये क्रिकेट खेळला असेल, पण जेव्हा तुम्ही खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहिले असेल तेव्हा ते त्यांच्या अधिकृत जर्सीतच दिसले असतील. प्रत्येक देशाची जर्सी वेगवेगळ्या रंगाची असते, पण टेस्ट सामने मात्र सर्व खेळाडू पांढऱ्या जर्सीत खेळतात. असे का?
टेस्टमध्ये पांढऱ्याच रंगाची जर्सी का?
काही अहवालांनुसार, टेस्ट सामन्यांमध्ये पांढरी जर्सी घालणे हे पूर्णपणे व्यावहारिक कारणामुळे आहे. कारण खेळाडूंना दिवसभर उन्हात खेळावे लागते. पांढरा रंग उष्णता कमी प्रमाणात शोषतो आणि जास्तीत जास्त सूर्यप्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे खेळाडूंना मैदानावर जास्त वेळ आरामात खेळता येते.
टेस्ट सामन्यात लाल चेंडूच का वापरतात?
आता दुसरा प्रश्न तुम्ही पाहिले असेल की वनडे आणि T20 सामन्यांमध्ये पांढऱ्या रंगाचा चेंडू वापरला जातो, पण टेस्ट सामन्यात लाल चेंडू असतो. असे का?
याचे कारण म्हणजे खेळाडूंची जर्सी पांढऱ्या रंगाची असते. जर चेंडूही पांढरा असता तर तो सहज दिसला नसता. म्हणूनच टेस्ट क्रिकेटमध्ये लाल रंगाचा चेंडू वापरला जातो, कारण तो दूरवरूनही सहज दिसतो आणि खेळाडूंना त्यावर लक्ष ठेवणे सोपे जाते.
Web Summary : Cricket is like a festival in India. Test matches use white jerseys for practical reasons: white reflects sunlight, keeping players cool during long matches. A red ball is used for visibility against the white clothing.
Web Summary : भारत में क्रिकेट एक त्योहार है। टेस्ट मैचों में सफेद जर्सी व्यावहारिक कारणों से पहनी जाती है: सफेद रंग सूर्य के प्रकाश को परावर्तित करता है, जिससे खिलाड़ी लंबे मैचों के दौरान ठंडे रहते हैं। सफेद कपड़ों के विपरीत दृश्यता के लिए लाल गेंद का उपयोग किया जाता है।