शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

या राजाची कबर उघडायला पुरातत्वशास्त्रज्ञ का घाबरतात? काय आहे रहस्य? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 21:54 IST

काही वर्षांपूर्वी या राजाची कबर सापडली. या कबरीच्या रक्षणासाठी हजारो सैनिक तैनात आहेत.

जगभरात असे अनेक राजे होऊन गेले, ज्यांच्याबद्दल आजही फार कमी लोकांना माहिती नाही. अशा राजांचा इतिहास म्हणजे, आजच्या इतिहासकारां किंवा पुरातत्वशास्त्रज्ञांनासाठी मोठे रहस्य आहे. असाच एक राजा चीनमध्ये होऊन गेला. हा चीनचा पहिला राजा होता, ज्याची कबर आजच्या पुरातत्वशास्त्रज्ञांना चकीत करते. 

काय आहे कबरीचे रहस्यआपण ज्या राजाच्या कबरीबद्दल बोलत आहोत, किन शी हुआंगची प्राचीन कबर आहे. प्राचीन चिनी इतिहासकार सिमा कियान यांनी राजाच्या मृत्यूच्या जवळपास एक शतकानंतर हुआंगच्या कबरीबद्दल लिहिले होते आणि या कबरीशी संबंधित धोक्यांबद्दल सर्वांना इशारा दिला होता. तेव्हापासून ही कबर उघडण्यास कोणीही पुढे आले नाही.

2000 वर्षे जुनी कबर1974 मध्ये चीनच्या शानक्सी प्रांतातील काही शेतकऱ्यांनी ही कबर पहिल्यांदा शोधली होती. पण जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले, तेव्हा त्यांना कळले की ही कबर चीनच्या पहिल्या सम्राटाची आहे आणि ही सुमारे 2000 वर्षे जुनी आहे. उत्खननादरम्यान कबरीभोवती दगडी सैनिकांची एक फौज आढळून आली.

रक्षणासाठी सैनिकांची फौजमीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, ही कबर बनवण्यासाठी कारागिरांनी एका खास तंत्राचा वापर केला आहे. या कबरीत तैनात असलेल्या सर्व दगडी सैनिकांच्या हातात तीन धनुष्य आहेत आणि ते आक्रमणाच्या मुद्रेत दिसतात. याशिवाय या कबरीत पाऱ्याची एक गुंतागुंतीची व्यवस्था करुन ठेवण्यात आली आहे.

या सैन्याला टेराकोटा आर्मी म्हणतात. या परिसरात उत्खनन केले असता, या कबरीच्या रक्षणासाठी 8000 सैनिक तैनात असल्याचे आढळून आले. चकीत करणारी बाब म्हणजे, या सैनिकांच्या चेहऱ्यावरील हावभाव अतिशय जीवंत व्यक्तीप्रमाणे दिसतात. यावर हॉलिवूडचा चित्रपटही तयार झाला आहे. द ममी चित्रपटामध्ये हे सैनिक जिवंत झाल्याचे दाखवण्यात आले आहे.  

टॅग्स :chinaचीनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय