शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

कोण होता जगातील सगळ्यात श्रीमंत मुस्लिम? संपत्ती इतकी की, अंदाजही नव्हता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:45 IST

इतिहासात एक अशीही व्यक्ती होऊन गेली ज्याच्या संपत्तीचा अंदाज लावणंही अवघड होतं.

Richest Man Ever : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. कधी चीनमधील तर कधी भारतातील तर कधी अमेरिकेतील लोक यात पुढे असतात. आत्ताच्या बऱ्याच सगळ्यात श्रीमंत व्यक्तींबद्दल आपल्याला माहीत असेल. पण इतिहासात एक अशीही व्यक्ती होऊन गेली ज्याच्या संपत्तीचा अंदाज लावणंही अवघड होतं.

अशाच एका व्यक्तीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचं नाव आहे मनसा मूसा. मनसा मूसाचा जन्म 1280 मध्ये आजचा आफ्रिकन देशाच्या टिम्‍बकटू शहरात झाला होता. 1312 पर्यंत त्याचा भाऊ मनसा अबु बक्र शासक होता. पण नंतर काही कारणाने मूसा राजा बनला. ज्यावेळी मनसा मूसा मालीचा शासक होता, तेव्हा तिथे सोन्याचे भांडार होते. असं म्हणतात की, त्यावेळी तिथे वर्षाला 1000 किलो सोनं जमिनीतून काढलं जात होतं. अमेरिकन वेबसाइट सेलिब्रिटी नेटवर्थच्या एका अंदाजानुसार, मनसा मूसाची एकूण संपत्ती 400 अब्ज डॉलर पेक्षा जास्त होती. काही लोक म्हणतात त्याची संपत्ती यापेक्षा जास्त होती.

जगातल्या अर्ध्या सोन्याचा मालक

मनसा मूसाचं खरं मूळ नाव मूसा कीटा फर्स्‍ट होतं. शासक बनल्यानंतर त्याला मनसा म्हणत होते. ज्या अर्थ बादशाह असा होतो. असं म्हटलं जातं की, आजच्या मॉरीटानिया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्किना फासो, माली, नाइजर, चाड आणि नायजेरियावर मूसाचं राज्य होतं.

ब्रिटिश म्यूजियमच्या एका रिपोर्टनुसार, मनसा मूसाच्या ताब्यात जगातलं अर्ध्यापेक्षा जास्त सोनं होतं. तो फार धार्मिक होता. मूसाने त्याच्या 25 वर्षाच्या शासनकाळात अनेक मशिदी बांधल्या. ज्या आजही आहेत. ज्यातील एक म्हणजे टिम्बकटूमधील जिंगारेबेर मशिद आहे.

मालीचा शासक मनसा मूसा 1324 मध्ये मक्केच्या यात्रेसाठी मालीहून निघाला तेव्हा त्याच्यासोबत 60 हजार लोक होते. या लोकांसमोर 500 लोकांचा संघ होता. जे 500 सोन्याच्या छडी घेऊन चालत होते. मूसा या लोकांसोबत सहारा वाळवंटातून आणि इजिप्त मार्गे मक्का येथे पोहोचला होता.

यात 100 पेक्षा जास्त ऊंटांवर हजारो किलो सोनं लादलेलं होतं. प्रत्येक ऊंटावर 125 किलो सोनं लादलं होतं. यात्रे दरम्यान मूसाचा मुक्काम इजिप्तच्या काहिरा शहरात झाला. असं सांगितलं जातं की, मूसा इतका उदार होता की, तिथे त्याने सोनं दान करणं सुरू केलं. त्यामुळे तिथे सोन्याचा भाव अचानक पडला आणि महागाई वाढली.मूसा काहिरातून गेल्यावर एक दशकापर्यंत सोन्याचे भावही वाढले नाही आणि महागाईही कमी झाली नाही. इतिहासकार सांगतात की, यामुळे काहिराची इकॉनॉमी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. असं सांगितलं जातं की, मूसामुळे मध्य-पूर्व भागात हजारो कोटींचं नुकसान झालं. 

मूसाने माली ते मक्का ही 6500 किमीची यात्रा पूर्ण केली. मनसा मूसाचं 57 वयात 1337 मध्ये निधन झालं. त्यानंतर त्याचा मुलगा सत्ता टिकवू शकला नाही. यामुळे मूसाने तयार केलेलं हजारो मैलांचं साम्राज्‍य अनेक तुकड्यांमध्ये विभागलं. त्यावेळचा सगळ्यात महत्वाचा नकाशा कॅटलन एटलस होता. ज्यात मूसा आणि मालीच्या साम्राज्‍याचं नाव होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहास