कोण आहे Juan Carlos?; ५००० महिलांसोबत होते संबंध; त्याच्यामुळे राष्ट्राची होत होती बदनामी, Sex Addict राजाचा 'असा' केला इलाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:40 PM2021-10-22T23:40:41+5:302021-10-22T23:46:31+5:30

Who is Juan Carlos ? जगभरातील राजा-महाराजांशी निगडीत अनेक किस्से इतिहासाच्या पानात लिहिली गेली आहे आणि ज्यांची आजही चर्चा केली जाते.

Who is Juan Carlos ?; He had relationships with 5,000 women; Spanish secret service 'injected King Juan Carlos with testosterone blockers | कोण आहे Juan Carlos?; ५००० महिलांसोबत होते संबंध; त्याच्यामुळे राष्ट्राची होत होती बदनामी, Sex Addict राजाचा 'असा' केला इलाज!

कोण आहे Juan Carlos?; ५००० महिलांसोबत होते संबंध; त्याच्यामुळे राष्ट्राची होत होती बदनामी, Sex Addict राजाचा 'असा' केला इलाज!

Next

जगभरातील राजा-महाराजांशी निगडीत अनेक किस्से इतिहासाच्या पानात लिहिली गेली आहे आणि ज्यांची आजही चर्चा केली जाते. या राजा-महाराजांची अशी काही गुपितं होती की ती फार कमी लोकांना माहित होती. ही गुपितं चांगलीही होती आणि वाईटही. पण, ती जाणीवपूर्वक जगापासून दूर ठेवण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून स्पेनचा ( Spain) माजी राजाचा एक किस्सा प्रचंड गाजत आहे. हे सत्य जाणून सर्वांनाच धक्का बसला आहे.

स्पेनच्या रॉयल कुटुंबातील माजी राजा ज्युआन कार्लोस ( King Juan Carlos) यांनी १९७५मध्ये राजाचे पद सांभाळले होते. आता ज्युआन यांच्याशी संबंधित एका विवादित वृत्तानं सर्वच थक्क झाले आहेत. दी टाइम्स, डेली मेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार ज्युआन हे Sex Addict होते आणि त्यांचे हे व्यसन संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय बनले होते. कारण, त्यांच्यामुळे देशाची प्रतीमा मलिन होत चालली होती.

स्पेनचे माजी पोलीस आयुक्त जोस मॅन्युएल ( Jose Manuel Villarejo) यांनी एका संसदीय हिअरींग दरम्यान हे धक्कादायक सत्य सर्वांना सांगितले. त्यांनी सांगितले की, ज्युआन यांना सेक्सचे एवढे व्यसन लागले होते की त्यांनी ५ हजाराहून अधिक महिलांशी (Relationship with 5000 women) संबंध ठेवले होते. त्यांचे हे व्यसन राष्ट्राची समस्या बनले होते. या व्यसनाचा इलाज करण्यासाठई ज्युआनच्या शरीरात स्त्री हार्मोन्स टाकावे लागले आणि पुरुष हार्मोन्सचे प्रमाण कमी करण्यात आले. 

डेली मेलनं दावा केला की ज्युआन यांनी राणी डायना यांनाही आपली प्रेयसी बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण हे वृत्त कितपत खरं आहे, यावर शंका आहे. स्पॅनिश इतिहासकार  Amadeo Martinez Ingles ने तर ज्युआन यांच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं नाव Juan Carlos: The King Of 5,000 Lovers असे ठेवले आहे. या पुस्तकात असा दावा केला गेला आहे की, ज्युआन हे ६ महिन्यांत ६२ महिलांशी संबंध ठेवायचे. ज्युआन (८३ वर्षीय) सध्या अबु धाबी येथे राहत आहेत. त्यांच्यावर  आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ते देश सोडून पळून गेले. 

Web Title: Who is Juan Carlos ?; He had relationships with 5,000 women; Spanish secret service 'injected King Juan Carlos with testosterone blockers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app