शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

कोण आहे तो जीनिअस ज्यानं बनवलं QR कोड स्कॅनर? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:45 IST

Who Is QR Code Founder : तुम्ही सुद्धा अनेकदा क्यूआर कोडचा वापर केला असेलच. पण या क्यूआर कोडचा आविष्कार करणारा व्यक्ती कोण हे तुम्हाला माहीत नसेल.

Who Is QR Code Founder :  बाहेर कुठेही गेलं तरी सगळीकडे क्यूआर कोडच्या पाट्या लागलेल्या दिसतात. दुकानं असो, मॉल असो किंवा कुठेही काही खरेदी करायला गेलं तर क्यूआर कोड दिसतातच. इतकंच काय तर लोक भिकही क्यूआर कोडवर मागू लागले आहेत. कुणाचे पैसे घ्यायचे असो किंवा कुणाला द्यायचे असो तेव्हाही क्यूआर कोड वापरलाच जातो. हे छोटे काळे-पांढरे चौकोणी कोड माहिती मिळवण्यासाठी आणि कामे वेगानं करण्यासाठी देखील मदत करतात. तुम्ही सुद्धा अनेकदा क्यूआर कोडचा वापर केला असेलच. पण या क्यूआर कोडचा आविष्कार करणारा व्यक्ती कोण हे तुम्हाला माहीत नसेल. याच व्यक्तीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव आहे मासाहिरो हारा.

कोण आहे मासाहिरो हारा?

मासाहिरो हारा एक जपानी इंजिनिअर आहे, ज्यानं क्यूआर कोडचा आविष्कार केला. त्याच्या या आविष्कारानं केवळ बिझनेसच नाही तर जगातील लोकांच्या टेक्नॉलॉजी वापरण्याच्या पद्धतीतही बदल झाला आहे. माराहिरो हाराचा जन्म १९५७ मध्ये टोकियोमध्ये झाला होता. बालपणी त्याला पझल्स सॉल्व करणं आणि वस्तूंच्या काम करण्याच्या पद्धती समजून घेण्याची आवड होती. त्यानं जपानच्या प्रसिद्ध टोकिया यूनिव्हर्सिटी ऑफ सायन्समधून शिक्षण घेतलं आणि इंजिनिअरींगमध्ये कौशल्य मिळवलं.

क्यूआर कोड कसा आला जन्माला?

मासाहिरो हारानं डेन्सो कॉर्पोरेशनमध्ये काम सुरू केलं, ही कार पार्ट्स तयार करणारी कंपनी आहे. इथे तो बारकोड स्कॅनिंग सिस्टीमवर काम करत होता, जेणेकरून कार बनवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी. पण जुन्या बारकोडमध्ये समस्या होत्या, त्यामुळे ते माहिती कमी ठेवू शकत होते. स्कॅन करण्यासाठी योग्य दिशा असणं गरजेचं होतं. मासाहिरोला वाटलं की, यापेक्षा चांगली पद्धत असली पाहिजे. यासाठी त्याला प्रेरणा मिळाली जपानी बोर्ड गेम “गो” मधून, ज्यात काळ्या-पांढऱ्या तुकड्यांना चौकोणी ग्रिडवर ठेवलं जातं. यातून त्याला दोन पद्धतीचा कोड बनवण्याची आयडिया मिळाली. 1994 मध्ये आपल्या टीमसोबत अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर हारानं क्यूआर कोड बनवला.

क्यूआर कोडची खासियत

आताचा क्यूआर कोड जुन्या बारकोडपेक्षा खूप वेगळा आहे. हा जास्त माहिती जसे की, अक्षर आणि नंबर स्टोर करू शकतो. तसेच वेगानं स्कॅन करता येतो. आधी याचा वापर फॅक्टरीमध्ये कार पार्ट्स ट्रॅक करण्यासाठी केला जात होता. मात्र, नंतर याचा वापर दुकानं, हॉस्पिटल, ट्रान्सपोर्ट आणि मनोरंजनासाठीही होऊ लागला. जेन्सो वेव हारा कंपनीनं क्यूआर कोड फ्रीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आणि याचं पेटंट केलं नाही. ज्यामुळे जगभरातील डेव्हलपर्स आणि उद्योजकांनी याचा फ्रीमध्ये वापर केला आणि आपल्या पद्धतीनं क्यूआर कोड आणखी विकसित केला.

मासाहिरो हारा आणि त्यांच्या टीमला या आविष्काराचा एक पैसाही मिळाला नाही. कारण त्यांचा उद्देश केवळ याला सगळ्यांच्या उपयोगासाठी बनवण्याचा होता. आज क्यूआर कोड कॅशलेस पेमेंट आणि फेक साहित्य रोखण्याच्या कामातही याचा वापर केला जातो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सKnowledge Centerज्ञानाचं केंद्रJara hatkeजरा हटके