Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे ज्या पद्धतीने कात टाकत आहे ते जगभरातील लोक बघत आहेत. नवीन रेल्वे, नवीन मार्ग आणि नवीन सुविधांसाठी रेल्वे वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहे. नवीन स्टेशन आणि प्लॅटफॉर्मची कामे सुरू आहेत. जुन्या प्लॅटफॉर्मचा चेहरामोहरा बदलला जात आहे. सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन हे सगळ्यात मोठं किंवा जास्त प्लॅटफॉर्म असलेलं स्टेशन असेल. पण असं नाहीये. नंतर काहींना वाटतं की, दिल्लीला सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असतील. पण असंही नाहीये. आज आम्ही आपल्याला सांगू की, देशातील कोणत्या रेल्वे स्टेशनवर सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म आहेत.
भारतातील सगळ्यात वेगळं रेल्वे स्टेशन
भारतातील एक रेल्वे स्टेशन सगळ्यात अनोखं आहे. या एकाच रेल्वे स्टेशनवर तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत आणि याचं क्षेत्रफळही फार जास्त आहे. इतकंच नाही तर हे रेल्वे स्टेशन सगळ्यात जुनं, बिझी आणि सगळ्यात मोठं आहे. हे रेल्वे स्टेशन तब्बल ६० ते ७० एकर परिसरात पसरलं आहे. १८५४ मध्ये सुरू झालेलं हे रेल्वे स्टेशन ऐतिहासिक लाल विटांसाठीही प्रसिद्ध आहे.
२३ प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन
देशातील सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन म्हणजे कोलकातामधील हावडा जंक्शन. हे एकुलतं एक असं स्टेशन आहे जिथे तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत.
दोन प्लॅटफॉर्मच्या मधे रोड
हावडा जंक्शन हे असं रेल्वे आहे, जिथे दोन प्लॅटफॉर्मच्या मधे एक रस्ता आहे. ज्यावरून लोक आपल्या वाहनांनी ये-जा करतात, गाडी पार्क करतात आणि मग तिथूनच रेल्वे पकडतात. हावडा जंक्शनच्या ८ आणि ९ तसेच २१ आणि २२ नंबरच्या प्लॅटफॉर्म मधे आपल्याला हे रस्ते बघायला मिळतात.
दोन राज्यात वाटलेलं रेल्वे स्टेशन?
देशात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. पण देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे, जे दोन देशात विभागलेलं आहे. म्हणजे ते अर्ध दुसऱ्या राज्यात आणि अर्ध वेगळ्या राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे नवापुर रेल्वे स्टेशन. हेच ते रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभागलं गेलं आहे. या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे, उरलेला अर्धा भाग गुजरातच्या तापीमध्ये आहे.
Web Summary : Kolkata's Howrah Junction is India's largest railway station, boasting 23 platforms spread across 60-70 acres. Notably, roads run between some platforms. The unique Navapur station straddles Maharashtra and Gujarat.
Web Summary : कोलकाता का हावड़ा जंक्शन भारत का सबसे बड़ा रेलवे स्टेशन है, जिसमें 60-70 एकड़ में फैले 23 प्लेटफॉर्म हैं। कुछ प्लेटफार्मों के बीच सड़कें चलती हैं। नवपुर स्टेशन महाराष्ट्र और गुजरात में फैला हुआ है।