शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील असे रेल्वे स्टेशन जिथे एक - दोन नाही चार भाषांमध्ये केली जाते अनाउन्समेंट, पाहा कोणतं आहे हे स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:11 IST

Railway Interesting Facts: आज आम्ही आपल्याला अशाच वेगळ्या रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, हे स्टेशन देशातील एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे ४ भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते.

Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे आता कात टाकत आहे. अनेक आधुनिक तंत्रज्ञानाने स्टेशन अपडेट केले जात आहेत. प्रवाशांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळ्या सुविधांची व्यवस्था केली जात आहे. भारतात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. त्यातील काही रेल्वे स्टेशन असे आहेत जे आपल्या एखाद्या खास गोष्टीसाठी ओळखले जातात. अशा अनोख्या रेल्वे स्टेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. एखाद्या रेल्वे स्टेशनचं नाव सगळ्यात लांब असतं, तर एखादं रेल्वे स्टेशन दोन राज्यात विभागलेलं असतं किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनवर सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असतात. आज आम्ही आपल्याला अशाच वेगळ्या रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, हे स्टेशन देशातील एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे ४ भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते.

भारतात एकूण किती रेल्वे स्टेशन? 

काही मिडिया रिपोर्टनुसार भारतात साधारण ७ हजार ३४९ रेल्वे स्टेशन आहेत. हे रेल्वे विशाल नेटवर्क देशभरातली प्रवाशांना जोडतं आणि यात हॉल्ट, छोटे स्टेशन, जंक्शन आणि टर्मिनलचा समावेश आहे. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, रेल्वेने देशात रोज जवळपास २ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियासारख्या देशाच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. देशात रोज १३ हजारांपेक्षा अधिक प्रवासी रेल्वे धावतात, ज्या ७ हजारांपेक्षा जास्त स्टेशन्सना जोडतात.

कोणत्या स्टेशनवर चार भाषांमध्ये अनाउन्समेंट

आपण अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल, तेव्हा आपण स्टेशनवर इंग्रजी, हिंदी भाषांमधील अनाउन्सनेंट ऐकल्या असतीलच. जास्तीत जास्त स्टेशनवर या दोन मुख्य भाषा वापरल्या जातात. पण आपल्याला माहीत नसेल की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे चार भाषांमधून अनाउन्समेंट केली जाते. हे रेल्वे स्टेशन म्हणजे नवापूर रेल्वे स्टेशन. या रेल्वे स्टेशनवर हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते.

नवापूर रेल्वे स्टेशनसोबतच देशात आणखी एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे चार भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते. ते म्हणजे वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा. हे एक छोटं रेल्वे स्टेशन असून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. इथे तमिळ, तेलगू, इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनाउन्समेंट केली जाते. 

नवापूर रेल्वे स्टेशनची आणखी एक खासियत 

पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येणार्‍या या रेल्वे स्टेशनच्या बऱ्याच गोष्टी खास आहेत. नवापूर रेल्वे स्टेशनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हे स्टेश महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यात विभागलं आहे. हे स्टेशनच नाही तर येथील प्लॅटफॉर्मवरील खुर्च्याही दोन राज्यात विभागल्या आहेत. या स्टेशनवर दोन्ही राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातचे कायदे लागू आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Navapur Railway Station: Where announcements are made in four languages.

Web Summary : Navapur and Venkatanarasimharajuvaripeta stations announce in four languages. Navapur uniquely straddles Maharashtra and Gujarat, its platform split between states, governed by both state laws.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे