Telephone Facts : टेलीफोनचा जमाना आता मागे पडलाय. पण यांचा वापर पूर्णपणे बंद झालेला नाही. टेलीफोनची जागा आता मोबाईलने घेतली आहे. म्हणजे आता तर घरातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल फोन असतो. पण आपल्याला माहीत आहे का की, भारतात टेलीफोन कधी आला आणि टेलीफोन घेणारी पहिली व्यक्ती कोण होती? किंवा त्यावेळी पहिल्या फोनचा नंबर काय होता? क्वचितच कुणाला या प्रश्नांची उत्तरं माहीत असतील. आज आपण याचा प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत.
भारतात टेलीफोन कधी आला?
भारतात टेलीफोन १८८१ मध्ये ब्रिटिश सत्ता असताना आणला गेला. इंग्लंडमधील एका खाजगी कंपनीने भारतातील तीन शहरांमध्ये एकाचवेळी तीन टेलीफोन एक्सजेंच सुरू केले. ह कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये सुरू केले होते. ही सेवा मुख्यपणे प्रशासनावर नियंत्रण, व्यापार आणि सैन्य संवादासाठी सुरू केली होती. कोलकातामध्ये २८ जानेवारी १८८२ मध्ये ही सेवा सुरू झाली. यात पहिल्या भारतीय व्यक्तीचा ५० कनेक्शनमध्ये समावेश करण्यात आला. ही टेलीफोन कनेक्शन मिळवणारी पहिली व्यक्ती ठरली.
भारतात जेव्हा पहिलं एक्सचेंज कोलकाता येथे सुरू झालं तेव्हा याची क्षमता फार जास्त कनेक्शनची नव्हती. याची क्षमता ९३ टेलीफोन कनेक्शन सांगण्यात येते. अशात इंग्रजांनी सुरूवातीलाच कुण्या भारतीयाला कनेक्शन देण्याचा विचार केला नव्हता. पण एक भारतीय असा होता ज्याला कनेक्शन देण्यात आलं. पण ते मिळणंही सोपं नव्हतं.
पहिला टेलीफोन मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती
भारतात टेलीफोन सेवा सुरू झाल्यावर बाबू सागर दत्त नावाच्या व्यक्तीला कनेक्शन देण्यात आलं होतं. दत्त हे एक १९ व्या शतकातील एक प्रसिद्ध बंगाली व्यापारी, उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती होते. ते भारतातील सुरूवातीच्या आधुनिक व्यापाऱ्यांपैकी एक होते. इतिहासात त्यांच्या नावाची नोंद या कारणानेही आहे की, ते भारतात टेलीफोन घेणारे पहिले भारतीय होते.
सागर दत्त हे मीठ, कापड आणि इतरही व्यापार करत होते. त्यावेळी कोलकाता शहर ब्रिटिश भारताची व्यवसायाची राजधानी होतं. भारतीय उद्योजकांचा एक नवा वर्ग समोर येत होता. सागर दत्त हे याच वर्गाचे प्रमुख प्रतिनिधी होते. यूरोपीय कंपन्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध होते.
टेलीफोन नंबर किती होता?
बाबू सागर दत्ता यांचं घर कोलूटोला भागात होतं. त्यांचा टेलीफोन नंबर ५० होता. तेव्हा टेलीफोन नंबरची सिस्टीम आजच्या तुलनेत सरळ आणि इंटरेस्टिंग होती. भारताचा पहिला टेलीफोन एक्सचेंज कोलकातामधील डलहौजी स्क्वेअरमध्ये सुरू करण्यात आलं होतं.
१८८२ मध्ये फोन नंबर फार कमी आकड्यांचे असायचे. या एक्सचेंजमध्ये एकूण ५० ग्राहक होते. त्यामुळे टेलीफोनचे नंबरही १ ते ५० असेच होते. नंबर १ एक्सचेंजचा होता. २ नंबर सरकारी कार्यालय. १५ नंबर एका कंपनीच्या ऑफिसचा होता, तर सागर दत्त यांचा नंबर ५० होता.
तेव्हा कसा लावला जात होता फोन?
त्यावेळी जेव्हा कुणाला फोन करायचा होता, तेव्हा फोनचं रिसिव्हर उचलताच टेलीफोन एक्सचेंजची रिंग वाजत होती. तेव्हा ऑपरेटरला सांगावं लागत होतं की, आपल्याला कोणत्या नंबरवर बोलायचं आहे. तेव्हा ऑपरेटर तो नंबर कनेक्ट करत होता. त्यावेळी आजसारखी ऑटोमॅटिक डायलिंग नव्हती.
Web Summary : In 1881, telephone service began in India. Babu Sagar Dutt, a Kolkata businessman, was the first Indian to get a connection; his number was 50. Early phones required operator assistance to connect calls.
Web Summary : भारत में टेलीफोन सेवा 1881 में शुरू हुई। कलकत्ता के व्यवसायी बाबू सागर दत्त कनेक्शन पाने वाले पहले भारतीय थे; उनका नंबर 50 था। शुरुआती फोन में कॉल कनेक्ट करने के लिए ऑपरेटर की सहायता की आवश्यकता होती थी।