शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातून येणारा इंटरनेट डेटा भारतात कुठे जमा होतो, आपल्यापर्यंत कुठून पोहोचतो? हे नक्कीच माहीत नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:26 IST

Internet Facts : इंटरनेट हवेतून तर येत नाही, मग समुद्रामार्गे आपल्या देशात शिरतं कुठून? आपल्यापर्यंत ते कसं पोहोचतं? चला तर पाहुयात आपण रोज वापरतो त्या इंटरनेटची पूर्ण सिस्टीम कशी काम करते.

Internet Facts : इंटरनेट आज आपल्या जीवनाचा कधीही दूर न करता येणारा भाग झालं आहे. दिवसभर टाइमपाससोबतच वेगवेगळी कामे करण्यासाठी इंटरनेटची गरज पडते. आपल्याला माहीत असेलच की, जगभरातील देशांमध्ये इंटरनेटचा पुरवठा हा समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून होतो. पण आपण कधी विचार केलाय का की, इंटरनेट हवेतून तर येत नाही, मग समुद्रामार्गे आपल्या देशात शिरतं कुठून? आपल्यापर्यंत ते कसं पोहोचतं? चला तर पाहुयात आपण रोज वापरतो त्या इंटरनेटची पूर्ण सिस्टीम कशी काम करते.

आपल्या कदाचित माहीत असेल की, देशात इंटरनेटची सेवा पहिल्यांदा १५ ऑगस्ट १९९५ मध्ये सुरू करण्यात आली होती. आपल्या वाचून आश्चर्य वाटेल की, याआधी सुद्धा देशात इंटरनेट होतं. शैक्षणिक रिसर्च नेटवर्कच्या माध्यमातून ते शिक्षण आणि रिसर्चच्या कामांसाठी वापरलं जात होतं. काही खास संस्थांकडे हे इंटरनेट होतं. 

कुठून येतो सगळा डेटा?

इंटरनेट रोज वापरलं जातं, पण ते आपल्यापर्यंत पोहोचतं कसं हे अनेकांना माहीत नसतं. अनेकांना तर असंही वाटतं की, ते सॅटेलाईट किंवा हवेच्या माध्यमातून येत असेल. पण तसं नाहीये. जगभरात इंटरनेट फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून पोहोचतं. समुद्राखाली असलेला केबल जगभरातील कॉम्प्युटर आणि सर्व्हरना एकमेकांशी जोडतो. हे एक ग्लोबल नेटवर्क आहे. जेव्हा आपण फोनवर काही सर्च करतो, तेव्हा आपला डेटा याच केबलच्या माध्यमातून समुद्राच्या पार असलेल्या सर्व्हरपर्यंत पोहोचतो आणि तिथून माहिती घेऊन काही सेकंदात आपल्या स्क्रीनवर परत येतो.

भारतात किती केबलने येतं नेट?

समुद्रातून येणारी केबल भारतात कुठे येते आणि किती केबल येतात? असा प्रश्न साहजिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या देशात इंटरनेट एकूण १७ आंतरराष्ट्रीय पाणबुड्या म्हणजे सबमरीन केबलच्या माध्यमातून पोहोचतं. हे १७ केबल समु्द्रातून भारताच्या समुद्री किनाऱ्यावरील ठिकाणावर पोहोचतात. या ठिकाणांना केबल लँडिग स्टेशन म्हणतात. भारतात हे स्टेशन मुंबईसोबतच चेन्नई, कोचीन, तूतीकोरिन आणि त्रिवेंद्रमसारख्या शहरांमध्ये आहेत. इथूनच पूर्ण देशात इंटरनेट पोहोचवलं जातं.

भारतात केबल लँडिंग स्टेशन अनेक आहेत. पण इंटरनेट मोठं ट्रॅफिक सांभाळण्यात दोन शहरांचा मोठा वाटा आहे. भारतात सगळ्यात जास्त इंटरनेट डेटा दोन मुख्य केंद्रातून जातो, एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे चेन्नई. देशातील लोकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय इंटरनेट पोहोचवण्यात या दोन शहरांचा मोठा वाटा असतो. 

एशिया - यूरोपशी कनेक्टेड भारत

भारताला इतर देशांसोबत जोडण्यासाठी समुद्राखालून वेगवेगळे केबल मार्ग आहेत. या अंडरवॉटर केबल मार्गांना SEA-ME-WE-4, SEA-ME-WE-5, I-ME-WE आणि Falcon नावाने ओळखलं जातं. या मोठ्या क्षमतेच्या लाइन भारताला यूरोप आणि आशियातील इतर देशांशी जोडतात. याच मार्गांच्या मदतीने आपण परदेशी वेबसाइट्स आणि अॅप्स सहजपणे वापरू शकतो.

कुठे जास्त वापरलं जातं इंटरनेट?

2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची एकूण संख्या ९५० मिलियन म्हणजे ९५ कोटी इतकी आहे. देशात सगळ्यात जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. एकट्या यूपीमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या साधारण १३ कोटीपर्यंत पोहोचली आहे. 

टॅग्स :InternetइंटरनेटInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके