शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्लेबॉय या अॅडल्ट मॅगेझिनमध्ये भारताचे पंतप्रधान झळकतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:45 IST

तुम्हाला वाचून धक्का बसेल की प्लेबॉयच्या वादग्रस्त पानांमध्ये झळकण्याचा पहिला मान मिळवणाऱ्या देशाचे प्रमुखांमध्ये कॅस्ट्रोही नव्हते वा कार्टरही नव्हते, ते होते भारताचे पंतप्रधान...

ठळक मुद्देप्लेबॉय हे मॅगेझिनचं वादग्रस्त होतं आणि हे नेहरू प्रकरणही वादापासून लांब राहिलं नाहीही मुलाखत नेहरूंनी दिली की त्यांच्या भाषणांमधून संकलन करून ही छापली हा वाद होतामात्र, संपादकांनी सांगितलं की प्रतिष्ठित पत्रकारांनी घेतलेली ती एक्सक्लुझिव्ह मुलाखत होती

प्लेबॉय या अॅडल्ट मॅगेझिनचे संस्थापक ह्युग हेफनर यांचे वयाच्या 91व्या वर्षी नुकतंच निधन झालं. नग्न व अर्धनग्न ललनांचे फोटो प्लेबॉयचं दीर्घकाळ राहिलेलं वैशिष्ट्य. परंतु, प्लेबॉय इंटरव्ह्यू हे देखील या मॅगेझिनचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जगातल्या प्रभावशाली व्यक्तिंपैकी माल्कम एक्स, फिडेल कॅस्ट्रोस मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, हेन्री मिलर, कॅशियस क्ले असे अनेकजण या मॅगेझिनमध्ये झळकले. परंतु, तुम्हाला वाचून धक्का बसेल की प्लेबॉयच्या वादग्रस्त पानांमध्ये झळकण्याचा पहिला मान मिळवणाऱ्या देशाचे प्रमुखांमध्ये कॅस्ट्रोही नव्हते वा कार्टरही नव्हते, ते होते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू.

फोर्ब्स या नियतकालिकाने हा विलक्षण प्रसंग ताज्या अंकामध्ये नमूद केला आहे. प्लेबॉयच्या 1963 सालातील ऑक्टोबरच्या अंकामध्ये नेहरूंची प्रदीर्घ मुलाखत छापण्यात आली. नेहरूंनीही अत्यंत विस्तृत आणि सर्वांगी चर्चा करत आपली मतं या अंकामध्ये मांडली होती. लोकशाहीची बलस्थानं, तिचे कच्चे दुवे, शीतयुद्ध, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताची लोकसंख्यावाढ आणि भारताचं भविष्य अशा अनेक विषयांवर नेहरूंनी प्लेबॉयच्या माध्यमातून आपली मते जगातल्या वाचकांपर्यंत पोचवली होती हे वाचून आज धक्का बसेल.

प्लेबॉय हे मॅगेझिनचं वादग्रस्त होतं आणि हे नेहरू प्रकरणही वादापासून लांब राहिलं नाही. याच अंकामध्ये संपादकांची टिप्पणी छापून आली होती. त्यात म्हटलं होतं, की बहुतेक मासिक छपाईला गेलं असताना, भारताच्या दूतावासाकडून आम्हाला असं सांगण्यात आलंय की, नेहरूंची मुलाखत ही काही एक्सक्लुझिव्ह व वैयक्तिक चर्चा नव्हती तर, पंतप्रधानांनी अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या केलेल्या भाषणांमधील मतांचं ते संकलन होतं. थोडक्यात म्हणजे प्लबॉयला नेहरूंनी मुलाखत वगैरे काही दिली नाही.

परंतु, संपादकांनी स्वताच नंतर हे खोडून काढत म्हटलं की, ही मुलाखत एका प्रतिष्ठित पत्रकारानं घेतली होती आणि त्यानं नेहरूंबरोबर स्वताचा काढलेला फोटोदेखील दाखवला होता. त्यामुळे या मुलाखतीबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, असं नमूद करण्यात आलं होतं.ते काही असलं तरी, प्लेबॉयची प्रतिमा लक्षात घेता अशा अॅडल्ट मॅगेझिनमध्ये प्रदीर्घ मुलाखत छापून येणारा पहिला राष्ट्रप्रमुख हे जवाहरलाल नेहरू असावेत ही बाब नक्कीच गमतीशीर ठरावी.

टॅग्स :playboy magazineप्लेबॉय मॅगेझिनJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूprime ministerपंतप्रधान