विमानतळावर प्रवाशाकडून बियर कॅन चेक इन करण्यात येते तेव्हा...
By Admin | Updated: July 11, 2017 20:33 IST2017-07-11T20:33:56+5:302017-07-11T20:33:56+5:30
विमानातून प्रवास करताना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सामान स्वत:जवळ बाळगता येत नाही. तर प्रवाशांकडील अवजड सामान हे विमानातील

विमानतळावर प्रवाशाकडून बियर कॅन चेक इन करण्यात येते तेव्हा...
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 11 - विमानातून प्रवास करताना ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सामान स्वत:जवळ बाळगता येत नाही. तर प्रवाशांकडील अवजड सामान हे विमानातील सामानाच्या कप्प्यात ठेवण्याची व्यवस्था असते. मात्र त्यासाठी विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांना आपल्याकडील अधिकचे सामान विमानतळावर जमा करावे लागले. पण ऑस्ट्रेलियातील क्वांटास एअरलाइन्सने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने चक्क स्वत:कडील बिअरचे कॅन सामान विभागात जमा केले. हा प्रवासी पर्थला निघाला होता. तेथे उतरल्यावर त्याने आपल्या या कॅनचा ताबा घेतला. हा प्रकार पाहिल्यावर तेथे उपस्थित असलेल्यांना या हटके लगेजचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही.
हा प्रवासी मेलबर्न येथून क्वांटासच्या क्यूएफ 777 या विमानाने पर्थला जात होता. त्याच्याजवळ बियरच्या कॅनव्यतिरिक्त काहीच सामान नव्हते. त्यावेळी थोडीशी गंमत करण्याची त्याला लहर आली. त्याने मेलबर्न विमानतळावर तपासणी करताना आपल्याकडील बियरचे कॅन लगेज विभागात जमा केले. मेलबर्न विमानतळावर सामानाची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे हटके लगेज पाहून काहीसा धक्काच बसला. पण त्यांनी ते कॅन आपल्याकडे जमा करून घेतले. प्रवास आटोपून जेव्हा पर्थला पोहोचल्यावर तो आपले सामान घेण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला हे कॅन परत मिळाले. एवढ्या सामानाचा गर्दीत कॅनला काहीही झाले नव्हते हे विशेष. मात्र बियरचे कॅनची अशी हटके पद्धतीने वाहतूक करणाऱ्या प्रवाशाचे नाव मात्र उघड करण्यात आलेले नाही.