शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलंच! इंजिनीयरने बनवली चाकाशिवाय धावणारी सायकल, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:51 IST

चाकाशिवाय धावणाऱ्या सायकलचा व्हिडिओ सध्या खूव व्हायरल होत आहे.

Wheelless Bicycle: 'सायकल', हे वाहतुकीचे सर्वात सोपे आणि स्वस्त साधन मानले जाते. सायकल पायाच्या सहाय्याने चालवली जाते. पूर्वी सायकल चालवण्यासाठी खूप ताकत लावावी लागायची, पण कालांतराने गिअरवाल्या सायकल आल्या. सध्या तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, बाजारात इलेक्ट्रिक सायकलदेखील उपलब्ध आहेत. पण, तुम्ही कधी चाके नसलेल्या सायकलला चालवले आहे का? हे वाचून थोडं विचित्र वाटेल, पण एका व्यक्तीने चाकांशिवाय चालणारी सायकल बनवली आहे. 

कोणी बनवली ही सायकल?साधारणपणे सर्व सायकलला दोन चाके, सीट, पेडल्स आणि हँडलबार असतात. यातही चाक सोडून सर्वकाही इतर सायकलप्रमाणेच आहे. इंजिनीयर आणि युट्यूबर Sergi Gordiev याने ही सायकल तयार केली आहे. सर्जी आपल्या कल्पनेच्या जोरावर वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल बनवत राहतो. ही आगळीवेगळी सायकल बनवण्याची संपूर्ण प्रोसेस त्याने यूट्यूबवर अपलोड केली आहे. 

चाकांशिवाय सायकल कशी बनवली?या सायकलला चाक नसले तरी ती फिरणारा रबराचा पट्टा लावला आहे. हाच पट्टा सायकलला पुढे जाण्यास मदत करतो. चाकांऐवजी व्हील बेल्टचे दोन सेट वापरण्यात आले आहेत. इंजिनियरने नेहमीच्या सायकलची साखळी या बेल्टला बसवली आहे. लष्कराच्या टँकमध्ये वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानावर हे चाक तयार करण्यात आले आहे. 

पेडलिंग केल्यावर साखळी फिरते आणि त्यामुळे हे रबर बेल्ट फिरुन सायकल पुढे सरकते. कोणत्याही सामान्य सायकलप्रमाणेच ही सायकल चालवता येते. पण, या सायकलचा वेग इतर सायकलपेक्षा खूप कमी आहे. पण, यात टायर पंक्चर होण्याची कोणतीही भीती नाही. इंजिनीअरने ही सायकल कशी तयार केली, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स