ब्रिटनची राणी एलिजाबेथचे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले असतील. या फोटोंमध्ये तुमच्या लक्षात येईल की, क्वचितच राणी तिच्या हॅंडबॅगशिवाय दिसते. म्हणजे त्यांच्याकडे सतत त्यांची हॅंडबॅग असते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, राणी एलिजाबेथ यांच्याकडे ही बॅग सतत का असते? पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला यामागचं विशेष कारण सांगणार आहोत.
महाराणी एलिजाबेथ त्यांच्या कर्मचाऱ्यांना गुप्त संदेश देण्यासाठी आपल्या पर्सचा वापर करतात. हा संदेश राणीला कोणत्याही वेळी बातचीतमधू बाहेर निघण्यास मदत करते.
ते कसं हे समजून घेऊ. जेव्हा राणी कुणाशी बोलत असेल आणि दरम्यान त्यांनी पर्स एका हातातून दुसऱ्या हातात घेणं सुरू केलं तर याचा अर्थ होतो की, त्या चर्चा संपवण्यासाठी तयार आहेत.
जर तुम्ही राणीसोबत बोलत असाल आणि अशावेळी त्यांनी त्यांची पर्स खाली ठेवली तर हा तुमच्यासाठी एक अशुभ संकेत असू शकतो. या प्रक्रियेचा अर्थ हा आहे की, राणी तुमच्यासोबत बोलणं एन्जॉय करत नाहीये आणि त्यांना तुमच्याशी बोलणं थांबवायचं आहे.
तसेच अनेकांना असाही प्रश्न पडतो की, राणी बॅगमध्ये काय ठेवत असतील? तर सामान्यपणे महिला ज्या वस्तू त्यांच्या पर्समध्ये ठेवतात त्याच वस्तू राणींच्या पर्समध्ये असतात. यात एक आरसा, लिपस्टिक, मिंट लोजेंग आणि चष्मा असतो. तसेच त्यांच्या पर्समध्ये एक हुक असते. या हुकचा वापर त्या टेबलवर बसताना बॅग लटकवण्यासाठी करतात.