Khichdi In English : तांदळाची खिचडी म्हणजे भारतातील लोकांसाठी जीव की प्राण असते. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी खाल्ल्या जातात. कुणी साधी खिचडी खातात, तर कुणी दाल खिचडी खातात. तांदूळ आणि डाळ मिक्स करून काही लोक त्यात भाज्या, तूप आणि टेस्टनुसार मसालेही टाकतात. खिचडीची खासियत म्हणजे ही सहजपणे पचते आणि शरीराला याचे अनेक फायदेही मिळतात. आपणही अनेकदा खिचडी खाल्ली असेल. देशभरात खिचडी हा शब्द सगळ्यांना माहीत आहे. पण आपल्याला माहीत आहे का की, खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्वचितच याचं उत्तर कुणाला माहीत असेल. तेच आज आपण पाहणार आहोत.
खिचडीचा 2500 वर्ष जुना इतिहास
खिचडीकडे हेल्दी डाएट म्हणून पाहिलं जातं. महत्वाची बाब म्हणजे खिचडीचा इतिहास 2500 वर्षापेक्षा जुना आहे. तांदूळ आणि डाळ एकत्र शिजवून खिचडी तयार केली जाते. यात काही लोक भाज्या किंवा मसालेही टाकतात. खिचडी भारतात मुघल काळापासून बनत आली आहे. यादरम्यान खिचडी इतकी फेमस झाली की, याचा समावेश शाही भोजनाच्या लिस्टमध्ये करण्यात आला.
खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात?
सोशल मीडियावर याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अनेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली. हे सत्य आहे की, अनेकांना खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे माहीत नाही. अशात आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत. तर खिचडीला इंग्रजीमध्ये hotchpotch असं म्हटलं जातं.
लगेच तयार होणारं पौष्टिक जेवण
खिचडी तयार करण्यासाठी तांदूळ आणि डाळ धुवून पाण्यात भिजवली जाते. नंतर एकत्र कुकरमध्ये टाकून शिजवली जाते. यात मसाले कमीच असतात, पण हळद, मीठ हे टाकलं जातं. सामान्यपणे खिचडी लगेच तयार होते आणि पौष्टिक असते.खिचडीमध्ये पोषक तत्व भरपूर असतात.
पचनासंबंधी समस्या असेल तर याने लगेच दूर होते. शक्ती मिळवण्यासाठीही खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पोट खराब असेल तर मूगाच्या डाळीची खिचडी खाल्ली जाते. खिचडी खाल्ल्यानं शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतात.