शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ब्लू व्हेलच्या हृदयाचं किती असतं वजन? आकडा वाचून डोकं चक्रावून जाईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 17:02 IST

वैज्ञानिकांनी ब्लू व्हेलच्या हृदयाची मोजणी केली. हे काही सोपं काम नव्हतं. ब्लू व्हेलचं एक हृदय कॅनडाच्या टोरांटोमधील रॉयल ओंटेरिओ म्युझिअममध्ये ठेवलं आहे.

जगात अनेक विशाल प्राणी-जीव आहेत. यातील काही असे आहेत ज्यांच्याबाबत वाचून हैराण व्हायला होतं. डायनासॉर आता नाहीत, पण त्यांच्याबाबतच्या गोष्टी वाचूनही लोक थक्क होतात. आता सगळ्यात वजनी आणि विशाल जीव म्हणून ब्लू व्हेलची ओळख आहे. या ब्लू व्हेलच्या हृदयाची लांबी आणि रूंदी व वजन वाचाल तर तुम्ही हैराण व्हाल. 

वैज्ञानिकांनी ब्लू व्हेलच्या हृदयाची मोजणी केली. हे काही सोपं काम नव्हतं. ब्लू व्हेलचं एक हृदय कॅनडाच्या टोरांटोमधील रॉयल ओंटेरिओ म्युझिअममध्ये ठेवलं आहे. हे हृदय ५ फूट लांब, ४ फूट रूंद आणि पाच फूट उंच आहे. याचं वजन साधारण १९० किलोच्या आसपास असतं.ब्लू व्हेलचं वजन सामान्यपणे ४० हजार पाउंड मानलं जातं. जर हृदय ४०० पाउंडचं असेल तर याचा अर्थ हा झाला की, हृदयाचं वजन ब्लू व्हेलच्या एकूण वजनांचं एक टक्के आहे. इतकं मोठं हृदय पृथ्वीवर कुणाचंच नाहीये. 

आफ्रिकन हत्तीला सध्या पृथ्वीवरील सर्वात लांब-रूंद प्राणी मानलं जातं. याचं गोलाकार हृदय ३० पाउंड म्हणजे साधारण १३.६ किलोचं असतं. म्हणजे व्हेलचं हृदय हत्तीच्या हृदयापेक्षा १४ पटीने जास्त वजनी असतं. तुम्हाला माहीत आहे का की, मनुष्याच्या हृदयाच वजन किती असतं. मनुष्याच्या हृदयाचं वजन साधारण १० औंसच्या बरोबर असतं म्हणजे २८३ ग्रॅम. म्हणजे व्हेलच्या हृदयाचं वजन मनुष्याच्या हृदयाच्या तुलनेत ६४० पट जास्त असतं. 

ब्लू व्हेलचं वजन सामान्यपणे १५० टन ते २०० टन दरम्यान असतं. आकारात डायनासॉरही ब्लू व्हेलची बरोबरी करू शकत नाही. एका मोठ्या ब्लू व्हेलची लांबी ३० मीटर म्हणजे ९८ फूटाच्या आसपास असते. म्हणजे बोइंग ७३७ इतकी. जेव्हा व्हेलचं पिल्लू जन्माला येतं तेव्हा त्याचं वजन ०२-०३ टन असतं. तर लांबी ८ मीटर असते.

ब्लू व्हेल जगातल्या सर्वच महासागरांमध्ये मिळते. या दरवर्षी हजारो मैल प्रवास करतात. त्यांचा मेंदू फार छोटा असतो. हा मेंदू साधारण  ६ किलोचा असतो. व्हेल सर्वात जास्त ऑक्सीजन घेते. त्यामुळे तिचे फुप्फुसंही सर्वात मोठे असतात. यांची क्षमता ५ हजार लीटरची असते. व्हेलची शेपटी साधारण ७.६ मीटरची असते. ५ मोठे आफ्रिकन हत्ती एका लाइनमध्ये उभे केले तर ते व्हेल इतके दिसतील. ११ कार यात सामावू शकतात.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स