शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

रेल्वेचे अनेक ट्रॅक तुम्ही पाहिले असतील, पण डायमंड रेल्वे क्रॉसिंग काय असतं माहीत नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 11:50 IST

भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी आहे.

Diamond Crossing : भारतात रेल्वेने जास्तीत जास्त लोक प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि स्वस्त असतो. प्रवासादरम्यान रेल्वे अनेक ट्रॅक दिसतात. हे ट्रॅक इतके वाकडे-तिकडे असतात की, लोकांनाही त्यांच्या असण्याचा प्रश्न पडत असेल. रेल्वेचे ट्रॅक असे असण्यामागे रेल्वेचे रूटही असतात. रेल्वे ज्या रूटने जाते ट्रॅक त्याच हिशेबाने अॅडजस्ट केलेले असतात. या ट्रॅकमध्ये एक खास प्रकारचा ट्रॅक असतो. ज्याला डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणतात.

हा ट्रॅकबाबत क्वचितच काही लोकांना माहीत असेल. त्याचं कारण म्हणजे भारतात रेल्वेचं इतकं मोठं जाळं असूनही ही डायमंड क्रॉसिंग एक किंवा दोनच जागी आहे. त्यांच्यावरही प्रश्न उपस्थित होतात की, या ट्रॅक्सना पूर्णपणे डायमंड क्रॉसिंग म्हणता येणार नाही. आज आम्ही तुम्हाला डायमंड रेल्वे क्रॉसिंग कसं असतं आणि कुठे आहे? हे सांगणार आहोत.

काय असतं डायमंड रेल्वे क्रॉसिंग?

रेल्वे ट्रॅकच्या जाळ्यात एका रस्त्याच्या चौकासारखं क्रॉसिंग असतं. ज्याला डायमंड क्रॉसिंग किंवा चौक म्हणतात. या क्रॉसिंगवरून चारही दिशांनी रेल्वे क्रॉस होतात. डायमंड क्रॉसिंग रेल्वेसाठी तसंच काम करतं जसा रस्त्यावर एक चौक किंवा ट्रॅफिक लाइट काम करतो. यात साधारण चार रेल्वे ट्रॅक असतात. जे दिसायला डायमंडसारखे असतात. त्यामुळे त्याला डायमंड क्रॉसिंग म्हणतात. सामान्यपणे जे रेल्वे क्रॉसिंग असतात ते एकाच दिशेने एकमेकांना कापतात. पण यात तसं नसतं.

भारतात कुठे आहे डायमंड रेल्वे क्रॉसिंग

काही रिपोर्ट्सनुसार भारतात केवळ नागपूरला डायमंड रेल्वे क्रॉसिंग आहे. जिथे चाारही बाजूने ट्रेनसाठी रेल्वे क्रॉसिंग आहे. पण अनेक रिपोर्ट्समद्ये असाही दावा करण्यात आला आहे की, नागपूरचं रेल्वे क्रॉसिंग डायमंड रेल्वे क्रॉसिंगच्या मापदंडात खरं उतरत नाही. कारण इथे केवळ ३ ट्रॅक आहेत. त्यामुळे याला डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणता येणार नाही.

नागपूरला ईस्टमध्ये गोंदियाहून एक ट्रॅक येतो, हावडा-राउकेला-रायपूर लाइन आहे. दुसरा ट्रॅक दिल्लीहून येतो. तेच साउथकडूनही एक ट्रॅक येतो आणि वेस्ट मुंबईहूनही एक ट्रॅक येतो. अशात याला डायमंड क्रॉसिंग म्हटलं जातं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेIndian Railwayभारतीय रेल्वे