Job Rule Interesting Facts : नोकरीबाबत जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. ज्यांचं पालन करणं फार गरजेचं असतं. नाही तर नोकरी मिळणं आणि टिकवणं अवघड होतं. पण जगात नोकरीबाबत असेही काही नियम आहेत, जे फारच विचित्र नियम आहेत. जे वाचून आपल्यालाही धक्का बसेल. असेच काही नियम आपण पाहणार आहोत.
- न्यूझीलॅंडमध्ये नोकरी करत असताना ऑफिसमध्ये फनी हॅट घालण्यास मनाई आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं असं केलं तर याला नियमांचं उल्लंघन मानलं जातं. त्यानंतर त्याच्या पगारातून 10 टक्के रक्कम कापली जाते.
- मीडिया रिपोर्टनुसार, जर्मनीमध्ये ओव्हरटाइम करणं गुन्हा मानलं जातं. ठरलेल्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं हा इथे गुन्हा आहे. इतकंच नाही तर कामाची वेळ संपल्यावर इथे कर्मचाऱ्याला संपर्क करण्यावरही बंदी आहे.
- जपानमध्ये एक मेटाबो लॉ आहे. ज्यानुसार आपल्या कंबरेचं माप घेऊन नोकरी दिली जाते. पुरूषांची कंबर 33.5 इंच आणि महिलांची कंबर 35.4 इंच पेक्षा जास्त असू नये, असा नियम आहे. जर कंबरेचं माप जास्त झालं तर त्यांना डायटिंग क्लास करावे लागतात किंवा तीन महिन्यांच्या आता वजन कमी करावं लागतं.
-तर ब्रिटनमध्ये जर एखाद्या कंपनीमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर कंपनी त्यांना सरकारला सूचना दिल्याशिवाय काढू शकत नाही. इथे कर्मचाऱ्यांना 1 ते 3 महिन्यांचा वेळे दिला जातो, जेणेकरून ते नवीन नोकरी शोधू शकतील.