VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 12:13 PM2020-12-01T12:13:46+5:302020-12-01T12:17:28+5:30

इंडोनिशाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात रविवारी एका भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Volcano erupts in Indonesia smoke goes 4 km away | VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ....

VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ....

Next

इंडोनिशाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात रविवारी एका भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा उद्रेक इतका खतरनाक होता की, येथील आकाशात सगळीकडे राख आणि धुराचे लोळ पसरले होते. येथून चार किलोमीटरच्या परिसरात याचा प्रभाव बघायला मिळाला.

या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ज्वालामुखीच्या प्रभाव इतका जास्त होता की, २,७०० पेक्षा अधिक लोकांना दुसऱ्या ठिकाणावर शरण घ्यावी लागली. इंडोनेशियातील प्रशासनानुसार, इथे जवळपास १३० सक्रिय ज्वालामुखी आहेत. अशाप्रकारच्या ज्वालामुखीचा प्रभाव काही महिने किंवा काही आठवड्यांपर्यंत राहतो.

 

हे ठिकाण राजधानी जकार्तापासून जवळपास २,६०० किलोमीटर दूर आहे. इले लेवोटोलोकमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर येथील आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. रॉयटर्ससोबत बोलताना १७ वर्षीय मुहम्मद इल्हामने सांगितले की, धमाका झाल्यावर आजूबाजूचे राहणारे लोक घाबरलेले आहेत आणि ते अजूनही शरण घेण्यासाठी ठिकाणा शोधत आहेत.
 

Web Title: Volcano erupts in Indonesia smoke goes 4 km away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.