शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

भारीच! शहामृगानं सायकलस्वारांनाही मागे टाकत जिंकली शर्यत; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 16:44 IST

Viral Video of ostrich in marathi : हा पक्षी उडू शकत नाही, पण सर्वांत वेगाने धावू शकतो. हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. सध्या असाच एका शहामृगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहामृग खूप कमीवेळा रस्त्यावर पाहायला मिळतात.

 लॉकडाऊनच्या काळात अनेक  प्राण्यांचे आणि पक्ष्याचे व्हायरल व्हिडीओज तुम्ही सोशल मीडियावर पाहीले असतील. ऐरवी गजबजलेले असणारे रस्ते लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे मोकळे होते. यामुळे माणसांना घाबरून पळत असलेल्या प्राण्यांना मोकळ्या रस्त्यांवर मुक्त संचार करायला सुरूवात केली. शहामृग हा जगभरातील सर्वांत मोठा पक्षी आहे. हा पक्षी उडू शकत नाही, पण सर्वांत वेगाने धावू शकतो. हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. सध्या असाच एका शहामृगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहामृग खूप कमीवेळा रस्त्यावर पाहायला मिळतात. 

तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्हिडीओमध्ये शहामृग सायकल रेसिंग करणाऱ्या माणसांबरोबर धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे सगळ्या सायकल स्वारांना मागे टाकत शहामृग ही शर्यत जिंकतो. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, सायकल रेसिंगच्या ट्रॅकवर काही माणसं सायकलिंग करत असताना हा शहामृग मध्येच येऊन त्यांच्याबरोबर धावतो आहे, हा मजेशीर व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

व्हिडीओ  दक्षिण आफ्रिकेतील असून यामध्ये हा शहामृग सायकलस्वारांबरोबर शर्यत लावताना दिसत आहे. डॅनिअल रेस नावाच्या सायकलस्वाराने आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. हा शहामृग केवळ या सायकल रेसरच्या बरोबरीने धावत नाही तर त्यांना मागे सोडत ही रेस जिंकतो. सुरुवातीला डाव्या बाजुने धावणारा शहामृग एकदम उजव्या बाजुला येवून धावू लागल्याने एका क्षणासाठी पुढे काय होणार याची उत्सुकता  प्रेक्षकाच्या मनात वाढते. विमान प्रवासादरम्यान महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियावर फोटो व्हायरल 

या व्हिडीओबाबत माहिती दिली आहे की,  सायकलस्वारांचा प्रवास सुरु असताना अचानक त्यांच्यामध्ये हे शहामृग आलं. त्यांच्या सायकल बरोबर शहामृग देखील धावू लागलं. त्यामुळे सुरुवातीला त्यांना याची भीती वाटली. हे शहामृग त्यांच्यावर हल्ला करेल की काय अशी भीती त्यांना होती. पण त्यानंतर हे शहामृग त्यांच्या सायकलबरोबर धावू लागलं. त्यामुळे सायकलस्वारांमध्येही आनंदाची भावना निर्माण झाली. अरे व्वा! बाबा का ढाब्यावर खवय्यांची तुफान गर्दी, रडणाऱ्या चेहऱ्यावर फुललं हसू, पाहा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके