शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:06 IST

या मजेदार व्हिडीओ क्लिपला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही रील आतापर्यंत जवळपास ३ कोटी वेळा पाहिली गेली आहे.

पावसाळा आला की, गर्मीपासून सुटका मिळते खरी, पण सोबतच एक नवीन टेन्शन देखील येतं, ते म्हणजे वाळत घातलेले कपडे भिजण्याचं! अचानक ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो, मग धावपळ होते. हे सारं टाळण्यासाठी अनेकजण नवनवीन युक्त्या शोधत असतात. पण, सध्या सोशल मीडियावर एका दीदीचा असा 'देसी हॅक' व्हायरल झालाय, जो पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल आणि कदाचित तुमच्या मनातही येईल, 'ही कल्पना आपल्याला का नाही सुचली?'

तुमचेही कपडे छतावर किंवा बाल्कनीमध्ये वाळत घातल्यावर अचानक पावसात भिजतात का? या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा नसला तरी, इन्स्टाग्रामवर 'antim_jatin_dhiman' या अकाऊंटवरून शेअर झालेली एक रील सध्या धुमाकूळ घालत आहे.

पाण्यात न भिजण्याची गॅरंटी, पण सुकण्याची...?या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला पावसाळ्यात छतावर कपडे वाळत घालताना दिसते. कपडे दोरीवर टाकल्यावर ती प्लॅस्टिकचा एक मोठा तुकडा घेते आणि त्या कपड्यांवर एखाद्या छत्राप्रमाणे व्यवस्थित झाकून टाकते.

कपडे पावसात भिजायला नको! आता या जुगाडात कपडे पावसात भिजणार नाहीत याची खात्री नक्कीच आहे, पण ते व्यवस्थित वाळतील का, याची मात्र गॅरंटी नाही. कारण पिशवीमुळे हवा खेळती राहणार नाही आणि कपड्यांना वाळायला जास्त वेळ लागू शकतो. पण, किमान अचानक आलेल्या पावसापासून कपडे वाचवण्याची धावपळ तरी टळेल हे नक्की.

कल्पना जोरदार, पण कपडे कसे सुकणार?या मजेदार व्हिडीओ क्लिपला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही रील आतापर्यंत जवळपास ३ कोटी वेळा पाहिली गेली आहे, तर ३ लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. शेकडो युझर्सनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युझरने गंमतीने लिहिले की, "आयडिया तर जोरदार आहे दीदी, पण कपडे कसे सुकणार?" दुसऱ्याने म्हटले की, "अरे, माझी मम्मी पण असंच करते!" तर एकाने म्हटले, "मस्त आयडिया आहे दीदी. आता धावत जाऊन पावसापासून कपडे वाचवण्याची धावपळ करण्यापासून सुट्टी मिळेल!"

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके