शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video : चॉकलेट पान, फायर पाननंतर बाजारात आलंय नवं 'डान्सिंग पान'! व्हिडीओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 16:58 IST

आजवर तुम्ही खायच्या पानाचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. चॉकलेट पान, बनारसी पान ते अगदी फायर पान यांची चवही घेतली असेल. पण, सध्या बाजारात ट्रेंडमध्ये आलेलं नवं डान्सिंग पान पाहिलंत का?

आजवर तुम्ही खायच्या पानाचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. चॉकलेट पान, बनारसी पान ते अगदी फायर पान यांची चवही घेतली असेल. पण, सध्या बाजारात ट्रेंडमध्ये आलेलं नवं डान्सिंग पान पाहिलंत का?. या डान्सिंग पानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका लग्न सोहळ्यात हे डान्सिंग पान पाहायला मिळालं आहे. लग्न समारंभातील या पानाच्या स्टॉलने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हे डान्सिंग पान लोकांना इतकं आवडलं की, लग्नाचा समारंभ सोडून सगळ्यांनी या स्टॉलवरच गर्दी केली आहे.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण असते. या खास क्षणांना आणखी खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रकार करत असतात. हल्ली लग्न समारंभामध्ये जेवण आणि नाश्त्यासोबतच पानाचा काऊंटर देखील आवर्जून ठेवला जातो. अशाच एका लग्नातील पानाच्या काऊंटरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लग्नातील पानवाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पानवाल्याने आपल्या पान काउंटरला चक्क 'बँडवाल्यांचा' अंदाज दिला आहे.

पान आणि परफॉर्मन्सचा धमाका

या व्हायरल व्हिडीओमध्ये पान बनवणारे लोक पारंपरिक बँडवाल्यांचे पोशाख परिधान करून जोशात नाचताना आणि गाताना दिसतात. पान बनवतानाच ते पाहुण्यांचे मनोरंजनही करत आहेत. या हटके सादरीकरणामुळे उपस्थित पाहुणे केवळ पानच नाही, तर त्यांच्या परफॉर्मन्सचाही आनंद घेताना दिसतात. पाहुणे नुसतेच चविष्ट पानाचा आस्वाद घेत नाहीत, तर त्या क्षणाचा आनंद लुटत आहेत. लोकांनी याला डान्सिंग पान असं नाव दिलं आहे. 

पानवाल्याचा परफॉर्मन्स ठरतोय ‘हिट’

पान तयार करताना नाचणाऱ्या या कलाकारांचा उत्साह, शैली आणि पान बनवण्याची सफाई पाहून सोशल मीडियावरील अनेक युजर्स थक्क झाले आहेत. या व्हिडीओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी त्यांच्या क्रिएटिव्ह आयडियाचं भरभरून कौतुक केलं आहे.

हा धमाल व्हिडीओ deoria_mems या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, यावर प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी म्हटलंय की, असा डान्सिंग पान स्टॉल त्यांनी आजवर कधीच पाहिला नव्हता.

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके