Viral News : सामान्यतः प्रत्येकाच्या तोंडात 32 दात असतात. मात्र मलेशियातील एका व्यक्तीच्या तोंडात तब्बल 42 दात आढळले आहेत. यामुळेच त्याचे नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले असून, त्यांची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
42 दातांचा अनोखा व्यक्ती
मलेशियातील प्रथाब मुनियांडी यांनी सर्वाधिक दात असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 33 वर्षीय प्रथाब तेल आणि वायू उद्योगात अभियंता म्हणून काम करतो. त्याच्या तोंडात एकूण 42 दात असून, हे सामान्य लोकांच्या तुलनेत 10 दात जास्त आहेत. 28 डिसेंबर 2023 रोजी या विक्रमाला अधिकृत मान्यता देण्यात आली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या तोंडात 42 दात असल्याची पुष्टी झाली.
चहा घेताना लागला शोध
प्रथाब यांना त्यांच्या अतिरिक्त दातांबद्दल पहिल्यांदा 2021 मध्ये कुटुंबासोबत चहा घेताना समजले. गप्पांच्या दरम्यान त्यांनी आपल्या तोंडात कदाचित जास्त दात असावेत असे सांगितले.
यानंतर कुटुंबीयांनी दात मोजले असता त्या वेळी 38 दात असल्याचे दिसून आले. नंतर डॉक्टरांनी एक्स-रे केल्यावर आणखी चार दात येणार असल्याचे स्पष्ट झाले.2023 च्या सुरुवातीपर्यंत त्यांच्या तोंडात एकूण 42 दात आले.
लोकांना बसत नाही विश्वास
प्रथाब सांगतात की, पहिल्या नजरेत लोकांना त्यांच्या जास्त दातांची कल्पना येत नाही. पण जेव्हा ते स्वतः सांगतात की, त्यांच्या तोंडात 42 दात आहेत, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटते. सामान्यतः लोकांच्या तोंडात 32 दात असतात, त्यामुळे 10 अतिरिक्त दात असल्याचे ऐकून लोकांना विश्वास ठेवणे कठीण जाते. इतके जास्त दात असूनही प्रथाब आपल्या दातांची विशेष काळजी घेतात. ते दिवसातून दोन वेळा ब्रश करतात आणि नियमित फ्लॉसही वापरतात.
हा विक्रम माझ्यासाठी खास
जगात सर्वाधिक दात असण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला जाणे हा अत्यंत खास अनुभव असल्याचे प्रथाब यांनी सांगितले. तसेच दातांची काळजी घेण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टरांचेही त्यांनी आभार मानले. विशेष म्हणजे, महिलांमध्ये सर्वाधिक दात असण्याचा विक्रम भारतातील कल्पना बालन यांच्या नावावर आहे. त्यांच्या तोंडात एकूण 38 दात आहेत.
‘हायपरडोंशिया’मुळे जास्त दात
डॉक्टरांच्या मते एखाद्या व्यक्तीच्या तोंडात सामान्यपेक्षा जास्त दात असण्यामागे हायपरडोंशिया (Hyperdontia) ही वैद्यकीय स्थिती कारणीभूत असते. याच कारणामुळे प्रथाब मुनियांडी यांची अनोखी स्मितरेषा आता जगभर चर्चेत आली आहे.
Web Summary : Prathab Muniandy, a Malaysian engineer, holds the Guinness World Record for having 42 teeth, ten more than usual. Discovered while having tea, his unique smile is due to hyperdontia. He maintains excellent dental hygiene.
Web Summary : मलेशियाई इंजीनियर प्रथाब मुनियांडी के 42 दांत हैं, जो सामान्य से दस अधिक हैं, इसलिए उन्होंने गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड जीता। चाय पीते समय पता चला, उनकी अनोखी मुस्कान का कारण हाइपरडोंशिया है। वे अपने दांतों की अच्छी देखभाल करते हैं।