शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:35 IST

एका तरुणाने आपल्या भावाच्या लग्नासाठी कंपनीत सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र, त्याला सुट्टी नाकारण्यात आली.

प्रत्येक जण ज्या कंपनीत काम करत असतो, तिथे सुट्टी घेताना काहीना काही अटी या असतातच. कधी आपण सुट्टी मागितली तर लगेच मिळते आणि कधीकधी मात्र एखाद्या कारणाने आपली सुट्टी नाकारली देखील जाते. मात्र, काही कंपन्या अशा आहेत, जिथे सुट्टी मागितली की नकारच मिळतो. अशाच एका कंपनीला तिच्या कर्मचाऱ्याने वेगळ्याच अंदाजात धडा शिकवला आहे. या तरुणाने असं काही केलं की, आता सगळेच या कंपनीला नावे ठेवत आहेत. 

एका तरुणाने आपल्या भावाच्या लग्नासाठी कंपनीत सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र, त्याला सुट्टी नाकारण्यात आली. यामुळे चिडलेल्या या कर्मचाऱ्याने थेट राजीनामा दिला. आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याची माहिती सगळ्यांना दिली आहे. या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर या घटनेबद्दल पोस्ट लिहीत संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्याने पोस्टमध्ये दावा केला आहे की, त्याच्या भावाचे लग्न अमेरिकेत असल्याने त्याने सुट्टी मागितली होती, मात्र त्यांनी रजा देण्यास नकार दिल्याने आपल्याला नोकरी सोडावी लागली. 

त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तीन आठवड्यांपूर्वी १५ दिवसांच्या रजेसाठी त्याने कंपनीकडे अर्ज केला होता, परंतु कंपनीने त्याला लग्नाला उपस्थित राहणे किंवा राजीनामा देणे यापैकी एक निवडण्यास सांगितले. अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीने राजीनामा देणे योग्य मानले. पोस्टमध्ये, त्या व्यक्तीने स्पष्टपणे सांगितले की त्याच्यावर कोणतीही मोठी आर्थिक जबाबदारी नाही आणि राहण्याची कोणतीही समस्या नाही. तथापि, त्याने तरीही रेडिट वापरकर्त्यांना विचारले की त्याचा निर्णय योग्य आहे की नाही? त्याने असा दावा केला की त्याने सुट्ट्यांची संख्या कमी करून तडजोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनी आपल्या निर्णयावर ठाम राहिली आहे.

Got asked to choose between my brother’s wedding and my job. Am I wrong for walking away?byu/Chuckythedolll inTwoXIndia

या व्यक्तीने सांगितले की, तो गेल्या ४ वर्षांपासून या कंपनीत काम करत होता आणि गरजेपेक्षा जास्त काम करत होता. त्याला त्याच्या कामानुसार चांगला पगारही मिळत नव्हता. आता तो दुसरी नोकरी न शोधता कंपनी सोडून गेला आहे. कंपनीने त्याला नोटीस कालावधी पूर्ण करण्यास सांगितले आणि धमकीही दिली असा आरोपही त्याने केला.

नेटकऱ्यांनी काय म्हटले?आता त्या माणसाच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक रेडिट वापरकर्त्यांनी त्याचे समर्थन केले आहे आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याचा त्याचा निर्णय अगदी योग्य असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले की, 'तुम्ही करिअरपेक्षा कुटुंबाची निवड केली. तुमच्या कंपनीने तुम्हाला फक्त एक साधन म्हणून पाहिले. तुम्ही अशी कंपनी सोडून देऊन योग्य निर्णय घेतला', तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'तुमचे काम कधीही कुटुंबापुढे मोठे नाही. भविष्यात कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी काम सोडल्याबद्दल अजिबात दोषी वाटून घेऊ नका'.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलResignationराजीनामा