शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

कोपराला होती छोटीशी दुखापत, डोक्यात सुरू झाल्या भयंकर वेदना; समोर आलं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 13:00 IST

हाताच्या कोपराला छोटीशी दुखापत झाली, त्यानंतर त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या वैद्यकीय तपासणीत जे समोर आलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मोठा धक्का बसला आहे. 

आपल्याला अनेकदा छोट्या छोट्या दुखापती होतच असतात. किरकोळ जखमाही होतात. पण आपण त्याला फार गांभीर्याने घेत नाही. पण काही वेळा ते महागात पडू शकतं. अमेरिकेतील एका व्यक्तीनेही तेच केलं. छोट्याशा जखमेचा इतका भयंकर परिणाम होईल याचा विचार त्याने स्वप्नातही केला नव्हता. त्याच्या हाताच्या कोपराला छोटीशी दुखापत झाली, त्यानंतर त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या वैद्यकीय तपासणीत जे समोर आलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला मोठा धक्का बसला आहे. 

अमेरिकेच्या रोड आयलँडमध्ये (Rhode Island, America) 35 वर्षीय टायसन बॉटेनस (Tyson Bottenus) राहतो. 4 वर्षांपूर्वी तो आपली होणारी पत्नी लीजासोबत फिरण्यासाठी कोस्टा रिकाला गेला होता. एक दिवस दोघंही सायकलिंग करत होते, तेव्हा टायसन सायकलवरून पडला. त्याच्या हाताच्या कोपराला जखम झाली. पण ही दुखापत छोटीशी असल्याने टायसनला त्याचं फार काही वाटलं नाही. त्याने पाण्याने धुवून ती जखम स्वच्छ केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने नर्सकडून त्यावर मलमपट्टी करून घेतली. अशा छोट्या जखमा घेऊन बरेच लोक येतात त्यामुळे नर्सलाही ती जखम फार गंभीर वाटली नाही.

सुट्टी एन्जॉय केल्यानंतर हे कपल अमेरिकेला आपल्या घरी परतलं. त्यानंतर  3 आठवड्यांनी टायसनच्या डोक्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याच्या चेहऱ्यावर लकवा मारला. त्याला हसणंही अशक्य होत होतं. त्याने बऱ्याच डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी टीबी, एड्स अशा बऱ्याच आजारांच्या टेस्ट त्याला करायला सांगितल्या पण यापैकी त्याला काहीच नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालं. त्याचवेळी मॅसाचुसेट्समधील एका रुग्णालयात ब्रेन कॅन्सरच्या प्रकाराबाबत माहिती मिळवताना डॉक्टरांना समजलं की टायसनच्या मेंदूत ब्लॅक फंगस (Black fungus in brain) घुसला आहे. 

टायसनच्या मेंदूत Cladophialophora bantiana हा दुर्मिळ फंगस होता. ज्यामुळे त्याला  ब्लॅक फंगस मोल्ड झाला होता. त्याच्या मेंदूचा एक भाग काळा पडत होता. हा मेंदूचा अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे. 1911  साली या आजाराबाबत माहिती झाली. तेव्हापासून आतापर्यंत या आजाराचे फक्त 120 प्रकरणं समोर आली आहेत. टायसनला कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला हा आजार झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी बांधला. टायसनवर उपचार सुरू करण्यात आले पण औषधांचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्याची दृष्टी आता कमजोर झाली आहे. त्या अंधत्वही येऊ शकतं, असं डॉक्टरांना वाटतं आहे. तो आपली दैनंदिन कामंही करू शकत नाही. मेंदूतील फंगसशी तो लढा देतो आहे पण तो बरा होईल अशी आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यAmericaअमेरिका