शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

भारतातील एक असं गाव जे दोन देशाचा भाग आहे, प्रमुखाला आहेत 60 बायका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:30 IST

Longwa Village in Nagaland : आज अशाच एका गावाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गाव पूर्व भारतातील आहे. या गावाची खासियत म्हणजे हे गाव दोन देशात वाटलं गेलं आहे.

Longwa Village in Nagaland :  भारतात देश आपल्या विविधतेसाठी ओळखला जातो. येथील संस्कृती आणि येथील साधं जीवन जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. भारताच्या चारही बाजूने असलेल्या राज्याच्या गावातील लोक आपल्या खास जीवनशैलीसाठी ओळखले जातात. यात काही गाव असेही आहेत जे खास आहेत. आज अशाच एका गावाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे गाव पूर्व भारतातील आहे. या गावाची खासियत म्हणजे हे गाव दोन देशात वाटलं गेलं आहे. गाव दोन देशांचा भाग आहे. येथील लोकांना दुहेरी नागरिकता मिळाली आहे.

लोंगवा गाव

या गावाबाबत सांगायचं तर या गावाचं नाव लोंगवा आहे. हे गाव नागालॅंडमध्ये आहे. हे गाव सामान्य गावासारखंच गाव आहे. पण एक खास बाब या गावाला वेगळं करते. ती बाब म्हणजे हे गाव दोन देशात विभागलं आहे. एक भाग भारतात तर दुसरा भाग म्यानमारमध्ये. गावातील लोकांना दुहेरी नागरिकता मिळाली आहे. ते सहजपणे भारतासोबतच म्यानमारमध्येही फिरू शकतात.

प्रमुखाच्या घरातून गेली आहे सीमा

Outlookindia नुसार, लोंगवा गावाच्या प्रमुखाच्या घरातून आंतरराष्ट्रीय सीमा गेली आहे. हे गाव राज्यातील मोन जिल्ह्यात येतं. जिथे प्रमुखच गावाचा परंपरागत शासक आहे. ज्याला ‘Angh’ म्हटलं जातं.

प्रमुखाला आहेत 60 पत्नी

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, प्रमुखाला 60 बायका आहेत. आणि म्यानमार आणि अरूणाचल प्रदेशातील साधारण 70 गावावर त्याचं राज्य चालतं.

कोन्याक जमातीचे लोक

Outlookindia नुसार, या गावात कोन्याक नागा जमातीचे लोक राहतात. ज्यांना देशातील शेवटची हेडहंटर जमात मानलं जातं. हे लोक कधीकाळी लोकांचे गळे कापून त्यांचं शीर आपल्या जवळ ठेवत होते. पण 1960 नंतर हे सगळं बंद झालं. 

चेहरे-शरीरावर टॅटू

कोन्याक जमातीच्या लोकांच्या चेहरे आणि शरीरावर टॅटू दिसतात. ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. हे लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, व्यक्तीच्या कवटीमध्ये त्याच्या आत्म्याची शक्ती असते. जी समृद्धी आणि प्रजनन क्षमता जुळलेली असते. आजही हे लोक Brass Skull Necklaces घालून दिसतील. जे त्यांची संस्कृती आणि परंपरा दाखवण्याचं काम करतात.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके