VIDEO: जेव्हा उंदिर पिल्लासाठी सापासोबत भिडतो

By Admin | Updated: July 5, 2016 13:04 IST2016-07-05T12:44:15+5:302016-07-05T13:04:00+5:30

सापाच्या तावडीत सापडलेल्या आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदराने सापाशी लढा दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे

VIDEO: When the upper part of the puppy comes up with a snake | VIDEO: जेव्हा उंदिर पिल्लासाठी सापासोबत भिडतो

VIDEO: जेव्हा उंदिर पिल्लासाठी सापासोबत भिडतो

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 05 - आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी काय करु शकते याचा प्रत्यय सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागलेल्या एका व्हिडिओवरुन येत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी उंदिर सापाशी लढा देताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उंदराने फक्त लढा दिला नाही तर आपल्या पिल्लाला वाचवलंदेखील आहे. 
 
या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला साप पिल्लाला घेऊन जाताना दिसत आहे, उंदिर त्याचा पाठलाग करतो, आणि त्याच्याशी लढा देतो. शेवटी साप पिल्लाला तिथेच सोडून पळ काढतो. पण तरीही उंदिर त्याचा पाठलाग सोडत नाही आणि जेव्हा साप दिसेनासा होऊन जातो तेव्हा परत आपल्या पिल्लाला घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून जातो.
 

Web Title: VIDEO: When the upper part of the puppy comes up with a snake