VIDEO: अरे बापरे ! सुट्टीसाठी गेलेल्या दांपत्याच्या हॉटेल रुममध्ये बिबट्या

By Admin | Updated: August 1, 2016 13:46 IST2016-08-01T13:44:16+5:302016-08-01T13:46:49+5:30

मेरठहून सुट्टीसाठी नैनीतालला गेलेल्या दांपत्याला आपल्या हॉटेल रुममध्ये बिबट्या दिसल्यावर धक्काच बसला

VIDEO: Hey father! Leopard in a hotel room of a holiday | VIDEO: अरे बापरे ! सुट्टीसाठी गेलेल्या दांपत्याच्या हॉटेल रुममध्ये बिबट्या

VIDEO: अरे बापरे ! सुट्टीसाठी गेलेल्या दांपत्याच्या हॉटेल रुममध्ये बिबट्या

ऑनलाइन लोकमत - 
नैनीताल, दि. 01 - एखाद्या पर्यटनस्थळी सुट्टी घालवण्यासाठी गेल्यावर राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आपण हॉटेल रुम बूक करतो. त्या हॉटेलमध्ये सर्व सुखसोयी मिळाव्यात ही अपेक्षा असते. मात्र मेरठहून सुट्टीसाठी नैनीतालला गेलेल्या दांपत्याला आपल्या हॉटेल रुममध्ये गेल्यावर धक्काच बसला...कारण तिथे त्यांच्या स्वागताला उभा होता बिबट्या. ऐकून विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. तल्लीताल परिसरात ही घटना घडली आहे. 
 
सुमीत राठोड त्यांची पत्नी शिवानीसोबत नैनीतालला सुट्ट्यांसाठी आले होते. सकाळी जेव्हा ते आपल्या रुममध्ये होते, तेव्हा बिबट्या खोलीत फिरत असल्याचं त्यांना दिसलं. जीव मुठीत घेऊन ते दोघे बेडच्या मागे लपले. जेव्हा बिबट्या वॉशरुममध्ये शिरला. तेव्हा सुमीत राठोड यांनी हिंमतीने जाऊन दरवाजा लगेच बंद करुन घेतला. 
 
 
खिडकीच्या सहाय्याने बिबट्या रुममध्ये शिरला होता. सुमीत यांनी कळवताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती. पण वॉशरुमच्या वेन्टिलेटरमधून बिबट्याने पळ काढला, आणि जवळच्याच जंगलात गायब झाला. मात्र या घटनेमुळे इतर पर्यटकदेखील प्रचंड घाबरले आहेत.
 

Web Title: VIDEO: Hey father! Leopard in a hotel room of a holiday