शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

10 रूपयात गर्लफ्रेंड, 3 हजारात बॉयफ्रेंड; व्हॅलेंटाईन डे ला वस्तूंसारखे भाड्याने मिळतात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:48 IST

Valentines Day 2023 : प्रेमाच्या जादूत हरवलेल्या प्रत्येक जोडप्याला तुम्ही प्रेमी समजण्याची चूक करू नका. यातही मोठा झोल असतो. कारण शो ऑफवर जगत असलेल्या दुनियेत आता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडही भाड्याने मिळते.

Valentines Day 2023 : जे लोक प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे चं फार महत्वं असतं. पण सिंगल लोकांचं काय? या लोकांसाठीही काहीना काही उपाय आजकाल उपलब्ध झाले आहेत. तुम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या गोष्टी ऑर्डर करत असता. तसे तुम्ही आता ऑनलाईन बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडही मागवू शकता. तेही कमिटमेंट नसणारे.

प्रेमाच्या जादूत हरवलेल्या प्रत्येक जोडप्याला तुम्ही प्रेमी समजण्याची चूक करू नका. यातही मोठा झोल असतो. कारण शो ऑफवर जगत असलेल्या दुनियेत आता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडही भाड्याने मिळते. एक दिवस प्रेम दाखवायचं आणि नंतर पैसे घेऊन आपल्या मार्गाने निघून जायचं. अनेक देशात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड भाड्याने मिळतात.

10 रूपयात गर्लफ्रेंड भाड्याने मिळते?

भाड्याने गर्लफ्रेंड मिळवण्याचं चलन अजून आपल्या देशात आलेलं नाही. पण शेजारी देश चीनमध्ये  2018 पासूनच लोकांमध्ये शो ऑफ करण्यासाठी गर्लफ्रेंड भाड्याने घेण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यावेळी 20 मिनिटांच्या सेवेसाठी 10 रूपये चार्ज केले जात होते आणि ही सेवा शॉपिंग मॉलमध्येही होती. द सनच्या एका रिपोर्टनुसार, स्टॅंडवर मॉडल 10-15 मॉडल्स असायच्या. ज्यातील एकीला 20 मिनिटांसाठी 10 रूपयांमध्ये हायर केलं जात होतं. त्यांना स्पर्श करणे किंवा मॉलच्या बाहेर नेण्याची परवानगी नव्हती.

App वरही आली हे सेवा

आता तर गर्लफ्रेंडची सेवा अॅपवरही आली आहे. चीन आणि जपानमध्ये सहजपणे अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासाठी गर्लफ्रेंड भाड्याने मिळवू शकता. त्यांच्या खाणं-पिणं, फिरणं करू शकता आणि पैसे देऊन त्यांना घरी सोडू शकता. अशीच सेवा बॉयफ्रेंडसाठीही आहे. तुम्हाला हवा तसा बॉयफ्रेंड मिळू शकतो. जपानमध्ये सहजपणे तुम्ही अॅपच्या माध्यमातून गर्लफ्रेंड भाड्याने घेऊ शकता. जपानमध्ये एका तासासाठी बॉयफ्रेंड भाड्याने घेण्यासाठी 5000 जपानी येन म्हणजे 3000 रूपये द्यावे लागतात. गरज पडली तर पूर्ण परिवारही तुम्ही भाड्याने घेऊ शकता.

भारतात भाड्याने मिळतात बॉयफ्रेंड

ज्या तरूणींना कमिटमेंट करायची नसते, त्या आपल्या देशातही काही तासांसाठी बॉयफ्रेंड बुक करू शकतात. 2018 मध्येच ‘Rent a Boy | Friend’ नावाने एका अॅपची सुरूवात झाली होती. 2022 मध्ये अशा अॅपची सुरूवात झाली. ज्याद्वारे तरूणी आपलं मन हलकं करण्यासाठी बॉयफ्रेंड हायर करू शकतात. 

मिठी देऊन आनंद देण्याची सेवा

तशी तर आपल्या देशात सतत मिठ्या मारल्या जातात. पण परदेशात याचीही सेवा आहे. जपानमध्ये 2011 मध्ये अशी सेवा सुरू झाली. ज्यासाठी 7 तासांपासून ते 12 तासांचं मेन्यू कार्ड होतं. यासाठी 17 हजार रूपयांपासून ते 30 रुपयांपर्यंत चार्ज केला जात होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय