शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीच्या प्रेमात पडली २६ वर्षीय तरूणी, आता तिघेही एकत्र करतात संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 16:43 IST

न्यूयॉर्कची राहणारी २६ वर्षीय नर्स रेबेका बोनोची भेट २९ वर्षीय डॉक्टर मार्टी कोलेसोबत ऑफिसमध्ये झाली होती. दोघांमध्ये आधी चांगली मैत्री झाली.

अमेरिकेत एका नर्सला तिच्यासोबत काम करत असलेल्या डॉक्टर आणि त्याच्या पत्नीवर प्रेम जडलं. आता तिघेही सोबत राहतात. न्यूयॉर्कची (New York) राहणारी २६ वर्षीय नर्स रेबेका बोनोची भेट २९ वर्षीय डॉक्टर मार्टी कोलेसोबत ऑफिसमध्ये झाली होती. दोघांमध्ये आधी चांगली मैत्री झाली.

नंतर जेव्हा रेबेकाला समजलं की, मार्टी २९ वर्षीय नताशा नावाच्या तरूणीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यांचा साखरपुडा झालाय तेव्हा तिने विचार केला की, एक दिवस मार्टीच्या होणाऱ्या पत्नीलाही भेटावं. त्यानंतर जेव्हा तिघांचीही भेट झाली तेव्हा त्यांना याची अजिबात कल्पना नव्हती की,  आता त्यांचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे. 

रेबेकाने सांगितलं की, 'कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन लागला होता आणि सर्व ऑफिस बंद होते. त्यावेळी आम्ही तिघे नेहमीच एकत्र वेळ घालवायचो. कधी डॉगीला घेऊन फिरायला जाणं, तर कधी डीनर आणि सोबतच पार्टीला जाणं होत होतं. मे २०२० मध्ये आम्हाला जाणवलं की, आम्ही जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवत आहोत. मग आम्हाला जाणवलं की, आम्ही तिघे जणू एका रिलेशनशिपमध्ये आहोत. पण लवकरच मार्टी आणि नताशा यांचं लग्न होणार होतं. तेव्हा आम्ही जरा चिंतेत पडलो की, आता काय करायच?'.

तिने सांगितलं की, 'मी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडिया साइट्सवर बघणं सुरू केलं की, आमच्यासारखे आणखी लोक आहेत का. जे एकत्र रिलेशनशिपमध्ये राहून फॅमिलीला पुढे नेत आहेत'.

रेबेका म्हणाली की, 'मी फार कन्फ्यूज होते की, मी त्यांचं लग्न अटेंड करावं की नाही. त्यावर ते दोघेही म्हणाले होते की, मी त्यांच्या लग्नाला आले तर त्यांना चांगलं वाटेल. अखेर मी त्यांच्या लग्नाला गेले. माझे आई-वडिलही लग्नात होते. पण मी त्यांना सांगितलं की, आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. त्यांना हे नव्हतं माहीत की, मी बायसेक्शुअल आहे. आणि हेही माहीत नव्हतं की, मी मार्टी आणि रेबेकासोबत रिलेशनशिपमध्ये होते'.

रेबेका म्हणाली की, 'पण मार्टी आणि नताशाच्या लग्नानंतर आम्हा तिघांचं नातं तसंच आहे. आम्ही तिघे अजूनही सोबत राहतो. तेही आधीसारखेच. मी माझं घर सोडून आता त्यांच्या घरात शिफ्ट झाले आहे. आधी माझ्या घरातील लोकांचा विरोध होता. पण त्यांनी जेव्हा पाहिलं की, मी दोघांसोबत आनंदी आहे तर त्यांनीही मला सपोर्ट केला'. 

 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप