US ELECTION - भारताच्या 'चाणक्य'ने केली ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी

By Admin | Updated: November 8, 2016 19:06 IST2016-11-08T15:58:11+5:302016-11-08T19:06:24+5:30

निवडणूक काळात भविष्यवेत्यांना खूप महत्व येते. यावेळी प्राण्यांकडून वर्तविल्या जाणा-या भविष्यावरही अनेकांचा विश्वास असतो.

US Elections - India's Chanakya predicts Trump's victory | US ELECTION - भारताच्या 'चाणक्य'ने केली ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी

US ELECTION - भारताच्या 'चाणक्य'ने केली ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. ८ - वर्ल्डकप सामने असो किंवा निवडणूका या काळात भविष्यवेत्यांना खूप महत्व येते. यावेळी प्राण्यांकडून वर्तविल्या जाणा-या भविष्यावरही अनेकांचा विश्वास असतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असताना चेन्नईतील चाणक्य माशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. 
 
माशांच्या टँकमध्ये दोनबाजूला डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांचे दोन फोटो व बोटीची छोटी प्रतिकृती होती.  यावेळी चाणक्यला खाद्य घातल्यानंतर त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोटीजवळचे खाद्य वेचले. सातवेळा चाणक्यने ट्रम्प यांच्या फोटोजवळच्या खाद्यांची निवड केली. 
 
चीनमध्येही अशाच प्रकारे एका माकडाने डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी भविष्यवाणी केली आहे. या माकडासमोर ट्रम्प आणि हिलरी क्लिंटनचे दोन मोठे पोस्टर ठेवण्यात आले होते. त्याने ट्रम्प यांच्या फोटोची निवड केली. 
 

Web Title: US Elections - India's Chanakya predicts Trump's victory