चालक नसलेली कार रस्त्यावर धावली आणि मोठ्या बातमीचा विषय बनली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:47 IST2017-08-10T00:38:47+5:302017-08-21T16:47:43+5:30
अर्लिंग्टनमध्ये (व्हर्जिनिया) गेल्या आठवड्यात चालक नसलेली कार रस्त्यावर धावली आणि ती मोठ्या बातमीचा विषय बनली होती; परंतु एका वृत्त वाहिनीच्या बातमीदाराला संशय आल्यानंतर त्याने सोमवारी तिच्यात डोकावून पाहिल्यावर ती चालकविरहित नसल्याचे आढळले.

चालक नसलेली कार रस्त्यावर धावली आणि मोठ्या बातमीचा विषय बनली
व्हर्जिनिया : अर्लिंग्टनमध्ये (व्हर्जिनिया) गेल्या आठवड्यात चालक नसलेली कार रस्त्यावर धावली आणि ती मोठ्या बातमीचा विषय बनली होती; परंतु एका वृत्त वाहिनीच्या बातमीदाराला संशय आल्यानंतर त्याने सोमवारी तिच्यात डोकावून पाहिल्यावर ती चालकविरहित नसल्याचे आढळले.
कल्पक चालकाने अशी वेशभूषा केली होती की, कारमध्ये फक्त चालकाची जागाच (ड्रायव्हर सीट) आहे असा भास व्हावा.
या करड्या रंगाच्या कारवर तसे काही चिन्ह नव्हते. ती चालकाशिवाय धावत असल्याचे दिसले. समोरची बसण्याची जागा ही पूर्णपणे रिकामी दिसली. टस नावाच्या बातमीदाराने आत पाहिल्यावर एका व्यक्तीने स्वत:चे संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कापड व इतर पोषाख केलेला होता. त्याचे हात पोषाखाच्या खालून स्टीअरिंग व्हीलवर होते.
त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. म्हणजे त्याला तर बाहेरचे दिसत होते; परंतु त्याला कोणी बघू शकत नव्हते. बातमीदाराने त्याला हटकून आपण थोडे बोलू शकतो का? असे विचारले. बरीच चौकशी केल्यावर व्हर्जिनिया टेक ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूटने सांगितले की, ही व्हॅन आणि तिच्यातील चालक हे दोघेही चालकविरहित कार या मोहिमेसाठीच्या अभ्यासाचे भाग आहेत. या अभ्यासात चालकाने कोणता पोषाख करावा हे ठरलेले होते. नियोजित चालकविरहित कारमध्ये चालकाच्या बसण्याची जागा अशी बनवण्यात आली आहे की, तीत चालक खूप कमी दृष्टीस पडेल, असे इन्स्टिट्यूटने म्हटले. गंमत म्हणजे चालकविरहित कारची बातमी
आल्यानंतर स्थानिक पोलिसांना
धक्काच बसला होता.