शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा! डेटवर बॉयफ्रेंडनं केलं असं काही की गर्लफ्रेंड पाहातच राहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 13:36 IST

प्रेमाचे दोन क्षण एकमेकांसोबत घालवण्यासाठी आणि गप्पांसाठी डेटवर जाणं प्रत्येक कपलला आवडतं. त्यात डेटवर जाणं आणि आपल्या बॉयफ्रेंडनं आपल्यासाठी काहीतरी खास प्लान करणं, सरप्राइज देणं याची प्रत्ये गर्लफ्रेंडला आतुरता असते.

प्रेमाचे दोन क्षण एकमेकांसोबत घालवण्यासाठी आणि गप्पांसाठी डेटवर जाणं प्रत्येक कपलला आवडतं. त्यात डेटवर जाणं आणि आपल्या बॉयफ्रेंडनं आपल्यासाठी काहीतरी खास प्लान करणं, सरप्राइज देणं याची प्रत्ये गर्लफ्रेंडला आतुरता असते. जर स्पेशल डेट असेल तर मग अगदी हॉटेल शोधण्यापासून ते कपडे कोणते घालायचे, हॉटेलचा मेन्यू काय आहे ते अगदी जागा रिझर्व्ह करण्यापर्यंतचं प्लानिंक कपल करत असतात. पण कॅलिफोर्नियात एका कपलची एक हटके कहाणी समोर आली आहे. 

आपला बॉयफ्रेंड आपल्याला रोमँटिक डेटवर घेऊन जातोय हे कळाल्यावर गर्लफ्रेंडनं अगदी कोणते कपडे घालायचे याच्या तयारीपासून ते सगळं अगदी टापटीप होईल याची काळजी घेत तयारी केली. बॉयफ्रेंडच्या आवडीचं सारंकाही तिनं केलं. पण डेटवर तिच्यासोबत जे घडलं ते पाहून तिला चक्क कपाळावर हात मारायची वेळ आली. कॅलिफोर्नियात राहणाऱ्या हैदी बर्बर नावाच्या मुलीसोबत हा प्रसंग घडला आहे. तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. 

हैदी हिनं तिच्या टिकटॉक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आणि जे घडलं ते चुकीचं होतं की बरोबर असा सल्ला तिनं आपल्या फॉलोअर्सला विचारला. मग काय तिच्या व्हिडिओवर जोरदार कमेंट्स येण्यास सुरुवात झाली आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. तिच्या व्हिडिओला आतापर्यंत ३४ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. 

नेमकं काय घडलं?हैदी तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होती. ती आणि तिचा बॉयफ्रेंड एका हॉटेलमध्ये गेले आणि ठरलेल्या टेबलवर बसले देखील. पण जेव्हा ऑर्डर द्यायची वेळ आली तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडनं फक्त त्याच्यासाठी खाण्याची ऑर्डर वेटरला दिली आणि हैदीला विचारलं देखील नाही. बॉयफ्रेंडच्या या कृतीनं हैदी त्याच्याकडे पाहातच राहिली. क्षणभर नेमकं तिच्यासोबत काय घडलं हेच तिला कळालं नाही. ज्या व्यक्तीसोबत आपण डेटवर आलो आहोत. त्याच्यासाठी एवढी तयारी केली आहे आणि त्यानं आपला विचारच करु नये? हे तिला खूप विचित्र वाटलं. हैदीनं डेटनंतर संपूर्ण प्रसंग व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या फॉलोअर्स आणि फ्रेंड्सना सांगितला. 

"मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एका मुलासोबत डेटवर गेले होते आणि त्यादिवशी माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. त्यात त्यानं फक्त स्वत:साठी ऑर्डर दिली आणि मला विचारलं देखील नाही. त्याचं हे असं वागणं मला खूप आश्चर्यचकीत करणारं ठरलं. अशा मुलासोबत मी पुन्हा डेटवर जायला हवं की नको?", असा सवाल हैदीनं सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सला विचारला.  त्यावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी बॉयफ्रेंडनं केलेल्या कृतीला चुकीचं ठरवलं आहे. तर काहींनी बॉयफ्रेंडकडून बिल भरलं जाईल किंवा ऑर्डर केली जाईल अशी अपेक्षाच का ठेवायची? आपण आपली ऑर्डर देऊ शकत नाही का?, असंही म्हटलं आहे. तर एकानं संबंधित मुलासोबत याआधी बिल देण्यावरुन काहीतरी प्रसंग घडला असेल आणि त्यातून त्याला चांगलाच धडा मिळाला असेल म्हणून त्यानं असं केलं असेल, असंही हैदीला सुचवलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया