शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! बॉयफ्रेंडच्या आईला खूश करण्यासाठी सोडली 10 लाखांची नोकरी, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 15:51 IST

एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत बेली हंटर नावाच्या एका महिलेने टिकटॉकवर केला आहे.

नवी दिल्ली : प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जातात. यूकेमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी तिची 10 हजार पौंड म्हणजेच सुमारे 10 लाख रुपयांची नोकरी सोडली आहे. विशेष म्हणजे, 10 लाख रुपयांची नोकरी सोडल्यानंतरही तिच्या प्रियकराच्या आईने तिला स्वीकारले नाही.

एका इंग्रजी वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा उल्लेख बेली हंटर नावाच्या एका महिलेने टिकटॉकवर केला आहे. टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर करताना महिलेने म्हटले की, हूटरमध्ये काम करते, हे तिच्या प्रियकराच्या आईला मान्य केले नाही. जरी मी प्रामाणिकपणे आणि कष्टाने आयुष्य जगत होते, परंतु माझ्या प्रियकराच्या आईला हे समजले नाही, असे बेली हंटर हिने म्हटले आहे.

प्रियकराला नोकरीबद्दल अडचण नव्हतीप्रियकराला माझ्या नोकरीबद्दल कोणतीही अडचण नाही. जेव्हा पहिल्यांदा प्रियकराच्या पालकांना भेटली, तेव्हा ते माझ्याशी चांगले वागले. पण जेव्हा त्यांना माझ्या नोकरीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा माझ्या प्रियकराच्या आईचा मूड बदलला. मी 10 लाख रुपये कमवत होती, तरीही प्रियकराच्या आईला नोकरी आवडत नव्हती, असे बेली हंटरने म्हटले आहे.

प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी सोडली नोकरीयानंतर बेलीने प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी नोकरी सोडली. ती नोकरी सोडल्यानंतर सोशल मीडियावर काम सुरु केले. यानंतरही प्रियकराच्या आईने त्याला सांगितले की, तिला बेली आवडत नाही आणि तिला स्वीकारू शकत नाही. बेलीच्या प्रियकराने सुरुवातीला आईला विरोध केला. पण तो त्याच्या आईवर खूप प्रेम करतो आणि सध्या त्याचा सर्व खर्च त्याची आई करत आहे. त्यामुळेच त्याचे आयुष्य आता त्याच्या आईच्या ताब्यात आहे.

व्हिडिओवर विविध प्रतिक्रियादरम्यान, बेली हंटरसाठी हा सर्वात मोठा धडा होता की, ती दुसऱ्याच्या आनंदासाठी तिची नोकरी सोडू शकत नाही. हा व्हिडिओ 220k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि Tiktok युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, तुम्ही त्या नात्यात कधीच आनंदी राहू शकल्या नसत्या. ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाहीत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके