शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नाद खुळा! ना घोडा, ना कार, स्ट्रेचरवरून नवरदेव पोहोचला लग्नमंडपात; एका लग्नाची भन्नाट गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 09:12 IST

नवरीच्या इच्छेसाठी आणि कुटुंब पाठीशी असल्याने राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं.

नवी दिल्ली - लग्न म्हटलं की सर्वांच्याच घरात आनंदाचं वातावरण असतं. प्रामुख्याने नवरदेव हा लग्नासाठी घोडा किंवा एखाद्या अलिशान गाडीमधून लग्नमंडपात येतो. पण तुम्हाला जर कोणी नवरदेव चक्क स्ट्रेचरवरून लग्नमंडपात घेऊन आल्याचं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. सध्या या अनोख्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होते आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिंधी समाजामार्फत सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्यात राहुल कटारिया आणि रितिका या जोडप्याचंही लग्न होणार होतं. लग्नाच्या पाच दिवस आधीच राहुल काही कामानिमित्त अहमदाबादला गेला होता. घरी परतत असताना त्याचा मोठा अपघात झाला. कुटुंबाला त्याच्या अपघाताची माहिती मिळाली. ते त्याला उदयपूरला घेऊन आले. पण पुन्हा ऑपरेशनसाठी त्याला अहमदाबादला न्यावं लागलं.

(फोटो - NBT)

राहुलच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या त्याच्या पायात रॉड टाकण्यात आला आहे. तसेच पायाल प्लास्टर लावण्यात आलं. ज्यामुळे त्याला चालणं शक्य होत नव्हतं. डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याने लग्न टाळण्याचा विचार केला. पण नंतर दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली. रितिकानेही सामूहिक विवाहस्थळी रितीरिवाजाप्रमाणे विधीवत लग्न व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.

राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं

नवरीच्या इच्छेसाठी आणि कुटुंब पाठीशी असल्याने राहुलने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेलाच लग्न करायचं ठरवलं. अपघातात तो गंभीर जखमी झाला. पण तरी विवाह मुहूर्त त्याने चुकू दिला नाही. एम्ब्युलन्समधून स्ट्रेचवर तो विवाहस्थळी पोहोचला. सिंधी समाजाच्या सेंट्रल युवा समितीच्या सदस्यांनी एम्ब्युलन्सह आवश्यक ती व्यस्था केली.  रितिकासोबत त्याने 7 फेरे घेतले आणि लग्नबंधनात अडकला. सर्वांनाच यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न