शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

"Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 15:40 IST

Uber Eats Order : डिलिव्हरी बॉयने जेवणाची ऑर्डरच संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. 

ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याकडे अनेकांचा सध्या अधिक कल असतो. एकदा जेवण ऑर्डर केल्यानंतर ते कधी घरी येतं असंच अनेकांना वाटतं असतं. मोबाईलमध्ये अनेकदा आपण त्याचं लोकेशन देखील पाहत असतो. मात्र तुम्हाला खूप भूक लागलेली असताना जर ऑर्डरचं घरी आली नाही अथवा ऐन वेळी ऑर्डर कॅन्सल केली तर प्रचंड संताप होतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लंडनमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयने जेवणाची ऑर्डरच संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. 

लंडनमधील इली इलियास या 21 वर्षीय तरुणीने जेवणाची ऑर्डर केली होती. तिने बर्गर, चिप्स, आणि चिकन रॅपर अशी साधारण 20 डॉलर म्हणजेच साधारण 1456 रुपयांची ऑर्डर केली होती. तिने उबर इट्समधून (Uber Eats) ही ऑर्डर केली होती. मात्र बराच वेळ झाला तरी तरुणीची ऑर्डर काही आली नाही. काही वेळानंतर तिला एक मेसेज आला. तो पाहून तर तिला धक्काच बसला. "सॉरी love, मी तुझं जेवण खाल्लं" असा मेसेज डिलिव्हरी बॉयने केला होता. 

इतकच नाही तर अ‍ॅपमध्ये जेवणाची ऑर्डर डिलिव्हर झाल्याचं दाखवत होतं. इलियाने या मेसेजचा एक स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आणि हा उबेर इट्सचा ड्रायव्हर ठीक आहे ना, असा सवाल केला. त्यानंतर मात्र उबरने तिच्याशी संपर्क साधला व तिला मोफत जेवण पाठवलं. मात्र या प्रकारानंतरही तिने ड्रायव्हरला दोष दिला नाही. कदाचित त्याला भूक लागली असेल. त्यामुळे माझं जेवण खाल्लं असेल, असं ती म्हणाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

खरंच की काय? बर्गर खाणं पडलं चांगलंच महागात; मोजावे लागले तब्बल 20 हजार, 160 किमी अंतर केलं पार

लॉकडाऊनच्या काळात कडक नियम लागू असताना आपल्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 160 किलोमीटर प्रवास केला आहे. बर्गरसाठी महिलेने हा प्रवास स्कूटीने केला आहे. मात्र बर्गर खाणं महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. कारण यासाठी तिला शे, बाराशे नाही तर तब्बल 20 हजार मोजावे लागले आहेत. कोरोनाने अनेक देशात थैमान घातले आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीत कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. अशातच इंग्लंडमध्ये एका महिलेला लॉकडाउनच्या काळात बर्गर खाण्याची खूप इच्छा झाली. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने बहिणीसह स्कूटीने तब्बल 160 किलोमीटर अंतर पार केलं. मात्र यासाठी पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला आहे.  त्यांना 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. 

 

टॅग्स :foodअन्नLondonलंडन