एक पोर्न साईट बंद केली की दुसरी सुरू
By Admin | Updated: August 30, 2014 02:57 IST2014-08-30T02:57:12+5:302014-08-30T02:57:12+5:30
देशातील पोर्न साईटस्वर बंदी घालण्यात हतबलता व्यक्त करताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, चार कोटी साईटस् आहेत.

एक पोर्न साईट बंद केली की दुसरी सुरू
नवी दिल्ली : देशातील पोर्न साईटस्वर बंदी घालण्यात हतबलता व्यक्त करताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, चार कोटी साईटस् आहेत. आम्ही एक बंद करतो, तर दुसरी नवीन साईट आलेली असते.
भारतातील चाईल्ड पोर्नोग्राफी आणि पोर्न साईटस् बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही असमर्थता दर्शवली.
पोर्न साईटस्चा सर्व्हर परदेशात असतो. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे, असे सरकारने न्यायालयाला सांगितले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे, असे केंद्र सरकार म्हणाले.
या समितीने पुढल्या सुनावणीत आतापर्यंत काय-काय केले याबद्दल न्यायालयाला सांगावे, असे न्यायाधीश म्हणाले. यावरील पुढील सुनावणी सहा आठवड्यांनी होणार आहे.
इंटरनेटवरील पोर्नोग्राफिक साहित्याला आळा घालण्यासाठी कायदा, तंत्रज्ञान आणि शासन यांच्या संयोग होणे आवश्यक आहे, असे सरन्यायाधीशांनी केंद्र सरकारला सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)