शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! बॉयफ्रेन्डला किस करणं गर्लफ्रेन्डला पडलं महागात, आता 'या' कारणाने मागतोय लाखो रूपयांची भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 12:03 IST

दोघे भेटले आणि दोघांमध्ये किस झाला. कॉन्वेने सांगितले की, आधी तर त्याला जोवानाच्या सर्दीबाबत माहिती नव्हती.

लंडनमध्ये राहणाऱ्या मार्टिन एशले कॉन्वेने त्याच्याच एका महिला मैत्रिणीवर आरोप केला आहे की, तिने त्याला किस केल्याने तो आजारी पडला आहे. यासाठी आता तो कोर्टाच्या दारात गेलाय.कॉन्वेने सांगितले की, एका सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून त्याची भेट जोवाना लवसेसोबत झाली होती. मग दोघांनी भेटण्याचा प्लॅन केला. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये किस झाला. कॉन्वेने सांगितले की, महिलेला आधीच सर्दी होती आणि तिने याबाबत त्याला काहीही सांगितले नाही. आता तिच्या सर्दीमुळे मला इन्फेक्शन झालं असून ओठांवर एक डाग पडलाय. ज्यामुळे अनेक दिवस तो आजारी होता.

डेली स्टारने दिलेल्या रिपोर्टनुसार, कॉन्वे सांगितले की, त्याला या इन्फेक्शनमुळे फ्लूसारखी लक्षणे आणि तोंडात फोड झाले आहेत. इतकेच नाही तर त्याला तापामुळे हॉस्पिटलमध्ये भरतीही व्हावं लागलं. या कारणाने संतापलेल्या कॉन्वेने महिलेवर केस करण्याची तयारी केली आहे आणि त्याने जोवाना लवसेकडून 136,328 पाउंड भरपाईची मागणी केली आहे.

कॉन्वेचं मत आहे की, लवसेने त्याला हे सांगितले नाही की, तिला सर्दी झाली आहे. याचा त्याला त्रास झाला. साधी गोष्ट आहे की, जर तुम्ही एखाद्या आजाराने पीडित असाल तर याबाबत दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे. जेणेकरून तो सावध होईल.

कॉन्वे व्यवसायाने एक फिटनेस कोच आहे आणि वेस्ट लंडनमध्ये राहतो. त्याने सांगितले की, सोशल मीडियाद्वारे 2019 मध्ये त्याची जोवानासोबत मैत्री झाली होती. ज्यानंतर दोघांचं नातं प्रेमात बदललं. 4 जुलै 2019 जोवानाने त्याला भेटायला बोलवलं होतं. 

त्यानंतर दोघे सेंट्रल लंडनमध्ये भेटले आणि दोघांमध्ये किस झाला. कॉन्वेने सांगितले की, आधी तर त्याला जोवानाच्या सर्दीबाबत माहिती नव्हती. पण जेव्हा तिचं मेकअप थोडं उतरू लागलं तेव्हा त्याला याबाबत समजलं. तो म्हणाला की, मला जराही कल्पना नव्हती की, साध्या सर्दीने तो इतका आजारी पडेल. त्यानंतर त्याने जोवानासोबत ब्रेकअप केलं. इतकेच नाही तर त्याने तिच्याकडे भरपाई मागितली आहे आणि तिच्यावर केस करण्याची तयारीही केली आहे.

बाबो! दरवाजा उघडताच पतीसोबत दिसली त्याची प्रेयसी; पत्नीने दोघांनाही धू-धू धुतले, व्हिडीओ व्हायरल...

बाबो! तरूणीने एका बुक्कीत फोडली हवेतील विमानाच्या खिडकीची काच, इतर प्रवाशी 'कोमात'...

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटके