शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 19:16 IST

दातदुखीच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. पण काहीवेळा हा त्रास जीवघेणा ठरू शकतो. अशीच एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे.

दातदुखीच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. पण काहीवेळा हा त्रास जीवघेणा ठरू शकतो. अशीच एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. डेवन वँटरपूल हा तरुण एका साध्या दातदुखी आणि हिरड्यांना आलेल्या सुजेवर उपचार करण्यासाठी डेंटिस्टकडे गेला होता. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. हिरड्यांमधून रक्त येत होतं आणि थोडी सूज होती. मात्र काही तासांतच परिस्थिती भयानक बनली. फ्लू सारखी लक्षणं, थंडी वाजणं आणि शरीरात आलेला अशक्तपणा यावरून हे लक्षात आलं की ही काही साधी समस्या नाही. डेवनची पार्टनर एलिसिया वाइल्डरने सांगितलं की, सुरुवातीला त्यांना हा किरकोळ आजार वाटला, पण प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे दोन दिवसांनंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं की, डेवन 'सेप्टिक शॉक' मध्ये होता. याचा अर्थ शरीरात इन्फेक्शन अत्यंत वेगाने पसरत होतं आणि महत्त्वाचे अवयव हळूहळू निकामी होत होते. जर तातडीने उपचार केले नसते, तर त्याच्या जीवाला धोका होता. शरीरातील इतर अवयवांना वाचवण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांनी अत्यंत कठोर निर्णय घेतला. या प्रक्रियेत डेवनचा उजवा पाय, डाव्या पायाचा गुडघ्यापासून खालचा भाग आणि दोन्ही हात कापून टाकावे लागले. हा निर्णय कठीण होता, पण यामुळेच त्याचा जीव वाचवणं शक्य झालं.

हिरड्यांमधून इन्फेक्शन कसं पसरलं?

डेंटिस्टकडे गेल्यावर त्याच्या हिरड्या कमकुवत झाल्या होत्या आणि त्यांना सूज आली होती. हिरड्यांमधून रक्त येत असल्यामुळे बॅक्टेरिया थेट शरीरात शिरले. सामान्यतः आपल्या तोंडात बॅक्टेरिया असतात, परंतु रक्ताद्वारे ते वेगाने पसरून गंभीर इन्फेक्शन निर्माण करू शकतात. डेवनच्या बाबतीत नेमके हेच घडलं. एलिसियाने सांगितलं  की, डेंटिस्टकडून परतल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांतच डेवनला जोरात थंडी वाजून शरीर थरथरू लागले, उलट्या आणि जुलाब सुरू झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर आणि लाईफ सपोर्ट मशीनवर ठेवावे लागले.

'पर्पुरा फुलमिनन्स' म्हणजे काय?

डेव्हनला 'पर्पुरा फुलमिनन्स' या अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक आजाराचा सामना करावा लागला. या स्थितीत त्वचा आणि टिशू वेगाने मरू लागतात, ज्याला  'नेक्रोसिस' म्हणतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास इन्फेक्शन संपूर्ण शरीरात पसरून मृत्यू ओढवू शकतो. डेवनची ही गोष्ट आपल्याला सावध करते की, कधीकधी साधी वाटणारी वेदनाही जीवघेणी ठरू शकते आणि अशा वेळी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Toothache led to amputation: Man's horrifying infection ordeal.

Web Summary : A man's toothache led to a life-threatening infection, resulting in amputation of limbs. Doctors diagnosed 'Purpura Fulminans,' a rare condition causing rapid tissue death. Prompt medical attention is crucial for seemingly minor ailments.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल