शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघानं करुन दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 12:53 IST

देशातील गावांना हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अजूनही लोक बाहेर शौचास जातात.

देशातील गावांना हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अजूनही लोक बाहेर शौचास जातात. म्हणजे अनेक ठिकाणी प्रशासन लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद करू शकलेले नाहीत. लोकांचीही बाहेर जाण्याची सवय सुटत नाहीये. पण हेच प्रशासनाचं काम एका वाघाने केलं आहे. वाघाने लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद केलंय. 

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडच्या महोबा आमि हमीरपूर जिल्ह्याच्या सीमेवर वाघ शिरलाय. त्यामुळे वाघाच्या भितीने या गावांमधील लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद झालं आहे. या गावांमध्ये सरकारने शौचालयेही बांधून दिले आहेत. तरी सुद्धा बाहेर नैसर्गिक विधीसाठी जात होते.पण आता गावात अचानक एक वाघ शिरल्याने लोकांचं बाहेर जाणं बंद झालं आणि ते घरातील शौचालयाचा वापर करू लागले आहेत. हा वाघ मध्यप्रदेशातील पन्ना जंगलातून भटकून इतके आल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. 

(प्रातिनिधीक छायाचित्र)

येथील वन विभागाचे अधिकारी रामजी राय यांनी सांगितले की, कुनेहटा गावातील एका व्यक्तीने शेतात वाघ बघितल्याची सूचना मिळाली होती. त्यामुळे वन विभागाने एक टीम वाघ पकडण्यासाठी तैनात केली आहे. आता सुरक्षा म्हणून लोकांना आग पेटवून सतर्क राहण्याचा सूचना करण्यात आली आहे. 

(Image Credit : nationalgeographic.com) (प्रातिनिधीक छायाचित्र)

आतापर्यंत वाघाला पकडण्यात यश आलं नाही. पण निदान या वाघाच्या भितीने लोक शौचालयाचा वापर करू लागले ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. वाघ जंगलात असूनही लोक घरात लपून बसत आहेत. कुणीही बाहेर शौलास जात नाही. गेल्या चार दिवसांपासून लोक असंच करत आहेत. त्यामुळेच गमतीत या वाघाला हागणदारीमुक्त योजनेचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणत आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेTigerवाघ