शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

320 वर्षापासून म्यूझिअमध्ये ठेवली आहे ही शापित खुर्ची, जे कुणी बसले त्यांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 10:32 IST

Cursed chair : डेनिअल हा थॉमसचा केवळ चांगला मित्रच नाही तर त्याची मुलगी एलिजाबेथसोबत थॉमसने लग्न केलं होतं. ज्यानंतर दोघे जावई-सासरे झाले.

Cursed chair : 18व्या शतकात इंग्लंडच्या थर्स्कमध्ये थॉमस बज्बी नावाची एक व्यक्ती राहत होती. त्याचा एक साथीदार होता ज्याचं नाव होतं डेनिअल औटी. असं सांगितलं जातं की, हे दोघेही खोटी  नाणी बनवण्याचं काम करत होते. डेनिअल हा थॉमसचा केवळ चांगला मित्रच नाही तर त्याची मुलगी एलिजाबेथसोबत थॉमसने लग्न केलं होतं. ज्यानंतर दोघे जावई-सासरे झाले.

कामानंतर रोज ते सोबत thirsk मधील त्यांच्या फेवरेट बारमध्ये बसत होते आणि तिथे दारू पित होते. थॉमस या बारमध्ये नेहमी एकाच खुर्चीवर बसत होता. जी त्याला खूप आवडत होती. जर त्या खुर्चीवर दुसरं कुणी बसलं तर थॉमस भांडण करत होता. पण पुढे जाऊन ही खुर्ची किती लोकांचा जीव घेणार आहे याचा कुणालाच अंदाज नव्हता.

ही कहाणी सुरू होते 1702 मध्ये. एक दिवस बारमध्ये काही कारणावरून थॉमस आणि डेनिअल यांच्यात भांडण होतं. दोघे एकमेकांना मारहाण करतात. मग थॉमसला चिडवण्यासाठी डेनिअल त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसला. थॉमसा हे बघून इतका राग आला की, त्याने डेनिअलची हत्या केली.

पोलिसांनी हत्येच्या आरोपात थॉमसला अटक केली. ज्यानंतर सासऱ्याच्या हत्येबाबत थॉमसला मृत्यूदंड देण्यात आला. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली. तेव्हा थॉमस म्हणाला की, त्याला त्याच्या आवडत्या खुर्चीवर बसून जेवण करायचं आहे. थॉमसची ही इच्छा मानली गेली आणि त्याला बारमध्ये नेण्यात आलं. जेवण केल्यावर तो उभा झाला आणि म्हणाला की, 'त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे जो माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत करेल'. तेव्हापासून ही खुर्ची शापित झाली.

Medium.com नुसार, दुसऱ्या महायुद्धा दरम्यान रॉयलचे दोन पायलट त्या बारमध्ये आले आणि त्याच खुर्चीवर बसले. त्यानंतर जेव्हा ते बारमधून बाहेर निघाले तेव्हा त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. सतत होत असलेल्या मृत्यूंमुळे बार मालकाने ही खुर्ची गोदामात ठेवली. पण इथेही या खुर्चीने लोकांचा पिच्छा सोडला नाही.

एकदा गोदाममध्ये एक मजूर थकल्यानंतर त्या खुर्चीवर बसला. नंतर एक तासांनंतर एका रोड अपघातात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बार मालकाने ही खुर्ची एका म्युझिअमला दान केली. तेव्हापासून 5 फूट उंचीवर ही खुर्ची लटकवण्यात आली आहे. जेणेकरून चुकूनही यावर कुणी बसू नये.

टॅग्स :Englandइंग्लंडInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके