'हे' आहे जगातील सर्वात खराब घर, एकही बेडरूम नाही पण किंमत तब्बल 15 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:11 PM2022-01-20T17:11:20+5:302022-01-20T17:11:39+5:30

महागडी घरे खरेदी करण्याचा विचार केला तर आलिशान घराचा नकाशा समोर येतो, जिथे बेडरुम, ड्रॉईंग रुम, किचन, बाथरुम खूप आहेत. पण घरात बेडरुम नसेल तर? अशाच प्रकारचे एक घर तब्बल 15 कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहे.

This is the worst house in the world, not a single bedroom but worth Rs 15 crore | 'हे' आहे जगातील सर्वात खराब घर, एकही बेडरूम नाही पण किंमत तब्बल 15 कोटी रुपये

'हे' आहे जगातील सर्वात खराब घर, एकही बेडरूम नाही पण किंमत तब्बल 15 कोटी रुपये

Next

वॉशिंग्टन: जगात अनेक महागडी घरे आहेत. तुम्ही अनेकदा महागडी घरांच्या खरेदी-विक्रीसंबंधी माहिती ऐकली किंवा वाचली असेल. अशाच प्रकारची एक विक्री अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झाली आहे. शहरातील एक घर तब्बल 15 कोटी रुपयांमध्ये विकले गेले, पण घराची खासियत म्हणजे यात एकही बेडरुम नाही. फक्त एक किचन आणि बाथरुम आहे. जगातील या सर्वात खराब घराची एवढ्या मोठ्या किमतीत विक्री झाल्याचे ऐकून लोकांना धक्काच बसला. 

घरात एकही बेडरुम नाही

Businessinsider च्या बातमीनुसार, हे घर 1900 मध्ये बांधले गेले आहे. या घराची खास गोष्ट म्हणजे यात एकही बेडरुम नाही. फक्त एक लहान स्नानगृह आणि स्वयंपाकघर आहे. या डीलबद्दल एका इंस्टाग्राम यूजरने सांगितले की, सॅन फ्रान्सिस्कोमधील 120 वर्षे जुने घर गेल्या आठवड्यात सुमारे 20 लाख डॉलर्स म्हणजेच 15 कोटींना विकले गेले. या घरात एकच स्नानगृह होते पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यात स्वयंपाकघरही बनवण्यात आले होते. 

अपेक्षेपेक्षा जास्त किंमत मिळाली
ही मालमत्ता विकणारे रिअल इस्टेट एजंट टॉड आणि विली यांनी सांगितले की, त्यांना वाटले होते की या घराला 12 कोटी रुपये मिळतील पण हे घर घेण्यासाठी स्पर्धा लागली. अखेर एका व्यक्तीने 15 कोटी रुपयांना हे घर घरेदी केले. हे घर अवघ्या 2800 स्क्वेअर फूट जागेत बांधले गेले असून, यात फक्त एक बाथरुम आणि किचन आहे.


 

Web Title: This is the worst house in the world, not a single bedroom but worth Rs 15 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.