शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

'या' फिल्ममेकरने महिनाभर खाल्ले फक्त मॅकडॉनल्ड्सचे पदार्थ, मग झालं असं काही वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:20 IST

आपली डॉक्युमेंट्री "सुपर साइज मी" मध्ये त्यानी जवळपास ३० दिवस केवळ मॅकडॉनल्ड्सचे पदार्थ खाल्लेत. तेही दिवसातून ३ वेळा. या त्यानी डॉक्युमेंटशन केलं, ज्याचे निष्कर्ष फारच धक्कादायक होते.

सिने निर्माता मॉर्गन स्परलॉक (Filmmaker Morgan Spurlock) ने २००४ मध्ये फास्ट फूड खाण्याच्या सवयीचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी एक प्रयोग केला. आपली डॉक्युमेंट्री "सुपर साइज मी" मध्ये त्यानी जवळपास ३० दिवस केवळ मॅकडॉनल्ड्सचे पदार्थ खाल्लेत. तेही दिवसातून ३ वेळा. या त्यानी डॉक्युमेंटशन केलं, ज्याचे निष्कर्ष फारच धक्कादायक होते.

स्परलॉक यानी स्वत:साठीच काही नियम करून घेतले होते. मॅकडॉनल्ड्सच्या मेन्यूमधील प्रत्येक पदार्थ किमान एक वेळी तरी खायचा. फास्ट फूड खाण्याच्या या प्रयोगाच्या पाचव्या दिवशी त्यांचं वजन ९.५ पाऊंड वाढलं होतं. २१ व्या दिवसापर्यंत त्यांचं वजन २४.५ पाऊंडने वाढलं होतं. त्यांचं कोलेस्ट्रॉल 168 ते 230 झालं होतं. तसेच त्यांच्या शरीरात फॅटचं प्रमाण ११ टक्के ते १८ टक्के झालं होतं.

"सुपर साइज़ मी" चं शूटिंग एक महिना चाललं.  इतके दिवस त्यांनी केवळ फास्ट फूड खाल्ले. यासाठी त्यांना ६५ हजार डॉलर इतका खर्च आला. या प्रयोगादरम्यान त्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या झाल्यात. डोकेदुखी, तणाव, मूडमध्ये चढउतार, कामेच्छा कमी होणे अशा समस्या जाणवल्या. पण डॉक्टरांना सगळ्यात जास्त चिंता होती ती त्यांच्या लिव्हरची. कारण लिव्हरवर फॅट वाढतच चाललं होतं. तसेच स्परलॉक यांना हे पदार्थ खाण्याची लालसा आणि जर ते खाल्ले नाही तर सुस्ती जाणवत होती. 

या डॉक्युमेंट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच यावर आक्षेपही घेण्यात आला होता. या फिल्मने २२ मिलियन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली होती. या फिल्मच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर फास्ट फूडबाबत चर्चा सुरू झाली होती. स्परलॉ़क यांनी प्रयोगातून फास्ट फूडच्या सवयीबाबत दाखवलं आणि लोकांची खाण्याची सवय बदलली. "सुपर साइज मी" डॉक्युमेंट्रीला सर्वौत्कृष्ट फीचरसाठी ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल