शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Optical Illusion: या फोटोत दडलंय तुमच्या आयुष्याचं रहस्य! फक्त सांगा- मांजर जिने चढतंय की उतरतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 12:29 IST

हे मांजर जिन्यावरून चढतं आहे की उतरतं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही दिलेल्या उत्तरातच तुमच्या जीवनाचं मोठं रहस्य लपलेलं आहे.

 फोटो बरंच काही सांगून जातो. फोटोत बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. अशाच एका मांजराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक मांजर जिन्यावर दिसतं आहे. हे मांजर जिन्यावरून चढतं आहे की उतरतं आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्ही दिलेल्या उत्तरातच तुमच्या जीवनाचं मोठं रहस्य लपलेलं आहे (Cat photo viral).

मांजराचा हा फोटो म्हणजे एक ऑप्टिकल इल्युजन आहे. म्हणजे दृष्टीभ्रम. सोप्या भाषेत सांगायचं तर दिसतं तसं नसतं, डोळ्यांनी जे पाहतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं किंवा जे असतं ते सहजासहजी दिसतच नाही. त्यामुळे असे फोटो पाहता पाहता चक्कर येते, त्याचं योग्य उत्तर सापडणंही अशक्य असतं.

आता या फोटोत पाहा मांजर जिन्यावर आहे. मांजराचं हे चित्र अशा पद्धतीने रेखाटण्यात आलं आहे की लोक कन्फ्युझ झाले आहेत. काही जणांना हे मांजर जिने चढताना दिसलं. तर काही जणांना हे मांजर जिने उतरताना दिसत आहेत. काहींना तर चढताना आणि उतरतानाही दिसत आहे.

आता याचं उत्तर तुमच्या स्टेट ऑफ माइंडवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही याकडे कोणत्या नजरेने पाहाल त्यावर हे अवलंबून आहे. जसं अर्धवट पाणी असलेला ग्लास. कुणी हा ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणतं तर कुणी हा अर्धा भरलेला आहे असं म्हणतं. हेच या फोटोच्या बाबतीतही आहे. आता या फोटोत तुम्हाला मांजर कसं दिसलं यावर तुमच्या जीवनातील सत्य काय आहे पाहुयात.

The Minds Journal ने हा फोटो शेअर केला होता. या जर्नलच्या आर्टिकलनुसार जर तुम्हाला मांजर जिने चढताना दिसत असेल तर तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. तुम्ही यश, प्रगतीची संधी, मार्ग शोधू शकता. तुमचा मेंदू आयुष्यात पुढे जाण्यासाठीच बनला आहे.

जर तुम्हाला मांजर जिने उतरताना दिसला तर तुमचा दृष्टिकोन निराशात्मक आहे. तुमच्या आयुष्यातील अनुभवांमुळे तुम्ही नकारात्मक झाला आहे. तुम्ही आयुष्यातील फक्त नकारात्मक बाजूच पाहता. तुम्ही कुणावरच लवकर विश्वास ठेवत नाही आणि तुम्हाला कुणी लवकर फसवूही शकत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया