शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ताडोबातील हा बर्डमॅन काढतो 200 पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 10:38 IST

पर्यटकांचे आकर्षण: अभयारण्यात आवाजाचे शो

लोकमत न्यूज नेटवर्क, चंद्रपूर / हिंगोली : तब्बल २०० पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा ‘बर्डमॅन’ सध्या पर्यटकांमध्ये चर्चेत आहे. सुमेधबोधी गंगाराम वाघमारे असे त्यांचे नाव आहे. हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील रहिवासी असलेले  वाघमारे  ताडोबा व्याघ्र प्रकल्पात कार्यरत आहेत.  त्यांच्या सुमधूर आवाजाने पक्षी, प्राणी त्यांच्याजवळ गोळा होतात.

पशुपक्ष्यांचे आवाज काढण्याच्या या कलेतून सुमेधबोधी यांची ओळख निसर्ग मार्गदर्शक, निसर्गप्रेमी झाली आहे. अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे यांच्या सोबतचे त्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या पक्षांचे आवाज

सुमेधबोधी मोर, पोपट, कावळा, कोकिळा, भारद्वाज, बुलबूल, कोंबडा, कोंबडी, चिमणी, साळुंकी, कोतवाल, धनेश, सुतार, घुबड, कबूतर, पारवा आदी पक्ष्यांसह बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळी, बेडूक, कोल्हा, कुत्रा, घोडा, मांजर, उंदीर या प्राण्यांसह डासांचाही हुबेहूब आवाज काढतो.

सध्या ते चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा नॅशनल पार्कमध्ये ‘नॅचरलिस्ट’ (निसर्ग मार्गदर्शक) म्हणून काम करतात. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना पक्षी, प्राण्यांबद्दल मार्गदर्शन करतात. सुमेधबोधीच्या या कार्याबद्दल वनविभागाच्या वतीनेही गौरव करण्यात आला आहे. त्यांचे शोदेखील ताडोबात आयोजित होत आहेत. पशु-पक्ष्यांसह निसर्गरक्षणाचे आवाहन ते विविध शोमधून करतात.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पnagpurनागपूर