Interesting Facts : मनुष्य असो प्राणी असो वा वनस्पती असोत सगळ्यांनाच जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज असते. याच कारणाने तर पाण्याला जीवन म्हणतात. जर पाणीच मिळालं नाही तर मनुष्याचा किंवा प्राण्यांचा जीव जाऊ शकतो. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असाही जीव आहे, ज्याला पाण्याची गरज नसते. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे जर या जीवाने पाणी प्यायलं तर त्याचा जीव जातो.
पृथ्वीवरील प्रत्येक जीवाची एक खासियत असते. त्यांचं हे वेगळेपण अनेकदा अचंबित करणारं असतं. आज आम्ही आपल्याला एका अशाच वेगळ्या जीवाबाबत सांगणार आहोत. हा जीव पाणी पिताच मरतो.
पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. पण हा जीव असा आहे जो पाणी प्यायल्याने मरतो. तो पाणी न पिताही जिवंत राहू शकतो. या खास जीवाचं नाव आहे कांगारू रॅट म्हणजेच कांगारू उंदीर. या जीवाचं मुख्य खाद्य बिया आहे. बिया खाऊनच या जीवाच्या शरीरात पाण्याची कमी भरून निघते. ज्यामुळे कांगारू रॅटला पाण्याची गरज पडत नाही.
असं मानलं जातं की, कांगारू रॅटची किडनी फारच कुशल असते आणि लघवीला घट्ट बनवते. एक्सपर्ट सांगतात की, पाणी प्यायल्याने या उंदराच्या शरीरातील पोषक तत्व वाहून जातात. कांगारू रॅट स्वत:हून कधी पाणी पित नाही. कारण त्याचा जीवा जातो.
उंदराची ही एक प्रजाती कांगारू रॅट उत्तर अमेरिकेच्या वाळवंटात आढळतात. असं सांगितलं जातं की, हा जगातील असा पहिला जीव असेल जो पाण्याविना जिवंत राहू शकतो. हा उंदीर कांगारूसारखा दोन पायांवर उड्या मारू शकतो आणि एका सेकंदात पाच मीटर अंतर पार करू शकतो. त्यामुळेच त्याला कांगारू रॅट म्हटलं जातं.
Web Summary : The Kangaroo Rat, found in North American deserts, uniquely survives without drinking water. It obtains moisture from seeds and possesses highly efficient kidneys. Drinking water can actually be fatal to this species, as it washes away vital nutrients.
Web Summary : उत्तरी अमेरिकी रेगिस्तान में पाया जाने वाला कंगारू चूहा बिना पानी पिए जीवित रहता है। यह बीजों से नमी प्राप्त करता है और इसमें कुशल गुर्दे होते हैं। पानी पीना इस प्रजाति के लिए घातक हो सकता है, क्योंकि इससे पोषक तत्व बह जाते हैं।