शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जगातील सर्वात सुंदर AI मॉडेल, हिला भेटण्यासाठी वेळ मागतायत लोक; महिन्याला कमावते 9 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:40 IST

तयार करायला लागले केवळ 3.69 लाख रुपये...!   

स्‍पेनमधील एका कंपनीने एक एआई मॉडल (AI Model ) विकसीत केली आहे. ही मॉडेल अत्यंत सुंदर आहे. या एआय मॉडेलला ऐटाना लोपेज (Aitana Lopez) असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, इंस्टाग्रामवर या मॉडेलचे 250,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. यावरूनच हिच्या पॉप्युलॅर‍िटीचा अंदाज लावला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, ही मॉडेल स्पेनमधील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली मॉडेल म्हणून ओळखली जाते. मात्र यामागे एक खास रहस्य आहे.

मिररने दिलेल्या एका वृत्तानुसार, नितळ त्वचा, मोहक स्मित, एथलेटिक बॉडी आणि गुलाबी केस, असलेली ही सुंदरी अनेकवेळा जगात घडणाऱ्या घटनांची छायाचित्रेही शेअर करत असते. याशिवाय ती विविध ब्रँड्सची जाहिरात करून प्रत्येक जाहिरातीतून 91,000 रुपये कमावते. आपल्याला आश्चर्य वाटेल की, पण हिचे मासिक उत्पन्न 9 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. खरे तर, हे एक एआय मॉडेल आहे, हे लोकांना माहीत आहे. पण तरीही ते बघण्यासाठी लोक संबंधित कंपनीला विनंती करत आहेत.. 

एटानाला कार्यान्वित ठेवण्यासाठी काम करते संपूर्ण टीम - ऐटाना लोपेझच्या इंस्टाग्राम बायोमध्ये दिलेल्यामाहितीनुसार, या 25 वर्षीय स्पॅनिश मॉडेलला ‘एआय’च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. तिच्या व्यवस्थेत आणि तिला चालविण्यासाठी एक संपूर्ण टीम काम करते. पुढील आठवडाभर ऐटाना काय करणार? कुठे जाणार? आणि कोणते फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर अपलोड करणार? याचे नियोजन केले जाते. विशेष म्हणजे, ऐटानाचे फोटो फोटोशॉपच्या माध्यमाने तयार केले जातात.

भेटण्यासाठी वेळ मागतायत लोक - स्पॅनिश फॅशन एजन्सी द क्लुलेसने ही मॉडेल तयार केली आहे. यासंदर्भात बोलताना कंपनीच्या सह संस्‍थापक डायना नुनेज म्हणाल्या, लोकांनी सुरुवातीला तर हिच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले. मात्र आता हिचे कौतुक होत आहे. अनेकांकडून भेटण्याची इच्छाही व्यक्त होत आहे. कंपनी हिला बार्सिलोनातील सर्वात उत्साही महिला म्हणून सादर केले आहे. हिला तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला असून एकूण 3.69 लाख रुपये एवढा खर्च आला आहे.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सtechnologyतंत्रज्ञानInstagramइन्स्टाग्राम