शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या ओरडण्याचा आवाज, शेजाऱ्याने बोलावले पोलीस, येऊन पाहताच मारला डोक्यावर हात, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 10:38 IST

Jara Hatke News: शेजारून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसही लावाजम्यासह मदतीसाठी निघाले. पोलिसांच्या तीन गाड्या सांगितलेल्या ठिकाणी दाखल झाल्या. मात्र जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा जे काही दिसलं ते पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.

शेजारून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसही लावाजम्यासह मदतीसाठी निघाले. पोलिसांच्या तीन गाड्या सांगितलेल्या ठिकाणी दाखल झाल्या. मात्र जेव्हा पोलीस घटनास्थळी आले तेव्हा जे काही दिसलं ते पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. त्याचं कारण म्हणजे जो ओरडण्याचा आवाज येत होता तो कुठल्या महिलेचा नाही तर एका पोपटाचा होता, असं समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा पोपट झाला म्हणण्याची वेळ आली. ही घटना ब्रिटनमधील कॅनवे  येथे घडली. 

कॅनवे येथील स्टीव्ह वुड्स हे गेल्या २१ वर्षांपासून आपल्या घरामध्ये पक्षी पाळत आहेत. सध्या त्यांच्याकडे बुग्गीज, निळे आणि सोनेरी मकॉय,  एक हेन मकॉय, दोन अॅमेझॉन पोपल, आठ भारतीय रिंगनेक आणि हिरव्या पंखांचा मकॉय यांच्यासह इतर प्रजातींचे पक्षी आहेत.

स्टीव वुड्स यांनी सांगितले की, माझ्याकडील पक्षी साधारणपणे सकाळच्या वेळी खूप ओरडतात. मात्र त्या दिवशी माझ्याकडे असलेल्या पोपटांपैकी फ्रेडी नावाच्या पोपटाने महिलेसारखा ओरडण्याचा आवाज काढला. काही वेळाने पोलीस आले. मी हसतच दरवाजा उघडला. पोलीस का आले आहेत, असा प्रश्न मला पडला. त्यातला एक पोलीस म्हणाला की चिंता करू नका मला वाटतं की, आम्ही त्याला पकडलंय, मी म्हणालो की, मी काय केलंय, तर ते म्हणाले की, तुमच्या घरातून महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत आहे, अशी तक्रार आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आम्ही येथे तपास करण्यासाठी आलो आहोत. पोलिसांनी योग्य काम केलं. तसेच ज्यांनी पोलिसांना फोन केला त्यांनीही योग्यच केलं. मला याबाबत काहीही वाईट वाटलं नाही, असं स्टीव्ह वूड्स यांनी पुढे सांगितलं.

मात्र या सर्व प्रकारामुळे लोक अवाक् झाले. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा ओरडण्याचा आवाज कुण्या महिलेचा नाही तर एका पोपटाचा होता, असे तपासातून समोर आले. जेव्हा हे समजले. तेव्हा पोलिसांनाही हसू आवरता आले नाही. आता हे प्रकरण संपुष्टात आले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPoliceपोलिसEnglandइंग्लंड