शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जगातली सगळ्यात महागडी भाजी, एक किलोच्या किमतीत येईल एवढं सोनं, असं आहे खास वैशिष्ट्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 21:12 IST

Most Expensive Vegetable: तुम्ही म्हणाल की, कितीही महाग असली तरी या भाजीसाठी फार तर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्रा तुमचा हा अंदाज चुकीचा आहे.

गेल्या काही काळापासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे भाजीपाल्याचे दर कडाललेले आहेत. त्यामुळे अनेकांचं दैनंदिन बजेट बिघडलं आहे. मात्र जगातील सर्वात महाग भाजी कोणती हे तुम्हाला माहिती आहे का. आता तुम्ही म्हणाल की, कितीही महाग असली तरी या भाजीसाठी फार तर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्रा तुमचा हा अंदाज चुकीचा आहे.  जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव हॉप शूट्स असं आहे. ही एक किलो

भाजी खरेदी करण्यासाठी लागणारी किंमत ऐकून तुम्ही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक किलो हॉप शूट्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला जेवढे पैसे मोजावे लागतील तेवढ्या किमतीमध्ये तुम्ही सुमारे १५ तोळे सोनं खरेदी करू शकता. हो एक किलो हॉप शूट्स भाजी खरेदी करण्यासाठी तब्बल ८ हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ही भाजी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचे आहे. अशी भाजी खरेदी करणे आणि खाण्याचं स्वप्न केवळ धनाढ्य लोकच पाहू शकतात. 

ही भाजी जगातील विशिष्ट भागातच तयार होते. अमेरिका आणि य़ुरोपमध्ये हॉप शूट्सला रुजवणे वाढवणे आणि तोडणे हे खूप जिकीरीचे काम मानले जाते. त्यामुळेच या भाजीची किंमत ही खूप जास्त आहे. भारताता हॉप शूट्स भाजीचं उत्पादन होत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये ही भाजी रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याला यश मिळाले नाही. या भाजीमध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. हॉप शूट्सच्या फुलाला हॉप कोन्स म्हणतात. या फुलाचा वापर बिअर बनवण्यासाठी केला जातो. फांद्या आणि पानांची भाजी केली जाते.. 

ही भाजी म्हणजे एक पर्वतीय रोप आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील लोकांनी याचे औषधी गुण कळल्यावर त्याची शेती सुरू केली. या भाजीचं शास्त्रीय नाव Humulus lupulus असं आहे. या भाजीचं रोप सहा मीटरपर्यंत वाढू शकतं. तसेच २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतं. हॉप शूट्स एवढी महाग असण्याचं कारण म्हणजे ती रुजवण्यासाठी खास वातावरणाची गरज असते. ती कुठेही उत्पादित होत नाही. या भाजीच्या उत्पादनावरही खूप पैसे खर्च होतात. एका रिपोर्टनुसार हॉप शूट्सचा सध्याचा जागतिक बाजारातील व्यवसाय हा ८.१ बिलियन डॉलर एवढा आहे. हॉप शूट्सचा बाजार वार्षिक ४.६ टक्के सीएजीआर ने वाढत आहे. तसेच २०३० पर्यंत तो १५.१ बिलियन डॉलरपर्यंत जाण्याची  शक्यता आहे.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयfoodअन्नJara hatkeजरा हटके