शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यातच बंद पडली 17 लाखांची कार, ढोल-ताशा वाजवत गाढवाच्या सहाय्यानं ओढली; बघा नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 11:58 IST

सोशल मिडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे... 

उदयपूरच्या एका व्यक्तीने आपली कार वारंवार खराब होत असल्याने आणि खरेदी केल्यानंतर, सपोर्टिव्ह स्टाफला कंटाळून मोठा निर्णय घेतला आहे. या व्यक्तीने ढोल-ताशा वाजवत आपली कार गाढवांच्या सहाय्याने शोरूमपर्यंत पोहोचवली. 17.50 लाख रुपयांची ही ह्यूंदाई क्रेटामध्ये वारंवार बिघाड होत असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. 

गाढवाच्या सहाय्याने शोरूमपर्यंत नेली कार - सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक गाढव महागडी कार रस्त्यावरून ओढताना दिसत आहे. एवढेच नाही, तर या वेळी कार मालकाने ढोल ताशा वाल्यांनाही बोलावले होते. याशिवाय आणखी काही लोकही या कारला मागून ढकलत होते. यावेळी बरेच लोक कार सोबतही चालत होते.

एका युजरने हा व्हिडिओ शेअर करताना, "भारतीयांसोबत कधीच पंगा घ्यायचा नाही. उदयपूर येथे 18 लाख रुपयांची गाडी खरा झाली. यानंतर कार मालकाने ती गाढवाच्या सहाय्याने शोरूममध्ये पोहोचवली. महत्वाचे म्हणजे, या कार मालकाने शोरूमवर फोन केला होता. मात्र तेथून कसल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने संबंधित व्यक्तीने आपली कार ओढवाच्या सहाय्याने ओडली," असे म्हटले आहे.

कार शोरूमवर नेण्याचा निर्णय -उदयपूरमधील सुंदरवास भागातील राज कुमार गायरी यांनी दावा केला आहे की, त्यांचे काका शंकरलाल यांनी शहरातील माद्री इंडस्ट्रियल भागातील एका स्टोरमधून 17.50 लाख रुपयांची एक नवी कार खरेदी केली होती. ऑथराइज्ड सर्व्हिस सेंटरला कारमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांसंदर्भात माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून मदत न मिळाल्याने काका निराश झाले होते. कार दोन वेळा सर्व्हिस सेंटरवर आणण्यात आली. मात्र डिल योग्य उपाय सांगू शकला नाही. राज कुमार यांनी सांगितले की,  गेल्या दोन दिवसांत एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान कार सुरू करण्यासाठी त्यांना प्रचंड धक्का द्यावा लागला होता.

यासंदर्भात सर्व्हिस सेंटरसोबत संपर्क साधला असता, तेथील एका कर्मचाऱ्याने ही समस्या बॅटर डिस्चार्ज झाल्याने आली असावी, बॅटरी चार्ज करण्यासाठी काही अंतरापर्यंत गाडी चालवा असे सांगितले. मात्र सर्व प्रयत्न करूनही समस्या न सुटल्याने, आम्ही कार डिलरशिपवर परत आणण्याचा निर्णय घेतला. तसेच गाडी बदलण्याचीही मागणी केली आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईSocial Mediaसोशल मीडियाcarकार